अजित पवारांचा काँग्रेसला धक्का! मोठ्या ओबीसी नेत्याचा पक्षात प्रवेश; विधानसभेचं तिकीटही देणार?

Bharat Manikrao Gavit : भरत माणिकराव गावित यांचा नंदुरबार भागातील मतदारांवर प्रभाव आहे.

Bharat Manikrao Gavit
भरत गावितांनी भाजपाच्या तिकीटावर २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. (PC : NCP Ajit Pawar)

Bharat Manikrao Gavit Joins Ajit Pawar Led NCP : नंदूरबारमधील काँग्रेस नेते व आदिवासींचे प्रश्न मांडणारे दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी आज (२० ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात भरत गावितांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे वडील दिवंगत माणिकराव गावित हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते. तसेच ते उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जायचे. माणिकराव गावित यांनी २००४ मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि २०१३ मध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

भरत माणिकराव गावित यांचा नंदुरबार भागातील मतदारांवर प्रभाव असून, त्यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षाचा आदिवासी जनाधार वाढू शकतो. सध्या ते आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे, नवापूरचे अध्यक्ष आहेत. ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, तसेच ते नवापूर विधानसभा मतदारसंघातील लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

हे ही वाचा >> दिल्लीतल्या स्फोटाचं कारण काय? घटनास्थळावरील ‘पांढऱ्या पावडर’मुळे फॉरेन्सिक टीम चकीत; दहशतवादी कटाचा संशय?

पक्षप्रवेशानंतर भरत गावित काय म्हणाले?

पक्षप्रवेशानंतर भरत गावित म्हणाले, “नवापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मी अजित पवारांबरोबर आलो आहे. या माध्यमातून मी माणिकराव गावित यांचा समृद्ध वारसा पुढे नेणार आहे”.

हे ही वाचा >> मसलतीनंतरही तिढा कायम; महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा चर्चा; ४० जागांचा गुंता

भरत गावितांनी भाजपाच्या तिकीटावर २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या शिरीषकुमार नाईक यांच्यासमोर गावितांचा पराभव झाला होता. नाईकांना ७५,६५२ मतं मिळाली होती. तर, गावितांना ५८,५५९ मतं मिळाली होती. गावित तिसऱ्या क्रमांकावर होते.

हे ही वाचा >> गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र; म्हणाल्या, “मावळते मुख्यमंत्री अन् त्यांचा पक्ष…”

अजित पवारांकडून पक्षात स्वागत

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भरत गावितांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. अजित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे चिरंजीव, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. माणिकराव गावितांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांचाच वारसा पुढे नेत भरतजी पक्षाच्या जनसेवा कार्यात कायम तत्पर राहतील, असा विश्वास मला आहे. त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bharat manikrao gavit joins ncp ajit pawar navapur assembly constituency asc

First published on: 20-10-2024 at 17:27 IST
Show comments