Premium

“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…

BHIM UPI Narendra Modi : भीम यूपीआयबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला दावा खोटा असल्याचं शिवसेनेने (ठाकरे) म्हटलं आहे.

Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
अंबादास दानवे यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. (PC : Narendra Modi X, bhimupi.org.in)

BHIM UPI Narendra Modi Claims its Related to Narendra Modi : अकोला येधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला आहे की आपल्या देशात मोबाइलद्वारे पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी सुरू केलेल्या प्रणालीला म्हणजेच यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) प्रणालीला आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेच भीम यूपीआय (BHIM UPI) असं नाव दिलं आहे. मात्र मोदी यांचा हा दावा शिवसेनेने (ठाकरे) खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे (ठाकरे) विधान परिषद सदस्य व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की भीम यूपीआयच्या संकेतस्थळावरून कुठेही सांगितलेलं नाही की या नावाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा काही संबंध आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, “जगाने नव्या डिजीटल चलनाचा स्वीकार केला आहे. पूर्वी जग चामड्याच्या नोटा वापरत होतं. फार पूर्वीच्या काळात दगडाची नाणी व चलनाचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तांब्यासह वेगवेगळ्या धातूंची नाणी अस्तित्वात आली. त्यानंतर कागदी चलन अस्तित्वात आलं. चलनामध्ये सातत्याने बदल होत गेले. आज जगभरात डिजिटल चलनव्यवस्था आहे. आपल्या देशाने यूपीआय (Unified Payments Interface) या डिजीटल चलनव्यवस्थेचा अवलंब केला आहे. यूपीआय हा डिजिटल चलनव्यवस्थेतील एक प्रकार आहे. याद्वारे आपण सर्वजण मोबाईलद्वारे पैशांची देवाण-घेवाण करू लागलो आहोत”.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हे ही वाचा >> अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”

मोदींचा दावा काय?

पंतप्रधान मोदी यांनी सभेला उपस्थित लोकांना विचारलं की “तुम्हाला माहिती आहे का आपण या डिजिटल चलनाचे नाव काय ठेवलं आहे? हा मोदी आहे… या मोदीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा आहे. म्हणूनच आम्ही या चलनाला भीम यूपीआय असं नाव दिलं आहे. जेणेकरून भविष्यात जेव्हा संपूर्ण देश या डिजिटल चलनाचा, डिजिटल ट्रान्जॅक्शनचा वापर करू लागेल किंवा प्रत्येक जण भीम यूपीआयचा वापर करत असेल, तेव्हा प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांची आठण येईल. प्रत्येकाला जाणीव होईल की हे काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे”.

हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

शिवसेनेने (ठाकरे) दावा खोडून काढला?

दरम्यान, मोदी यांनी दावा केल्यानंतर अंबादास दानवे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर भीम यूपीआयच्या संकेस्थळावरील माहितीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख नसल्याचं दानवे यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की “BHIM UPI चे नाव बाबासाहेबांच्या नावावर ठेवलंय अशी अजून एक बतावणी पंतप्रधान मोदींनी अकोल्यात केली. मोदीजी, याचा फुलफॉर्म हा BHARAT INTERFACE FOR MONEY हाच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिला आहे. इथे तर बाबासाहेबांचे नाव कुठेच नाही! हे खोटं बोलून आमचे दलित बांधव भुलणार नाहीत! हे घ्या पुरावा…”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhim upi is not related to babasaheb ambedkar says ambadas danve narendra modi claim found false asc

First published on: 09-11-2024 at 17:56 IST

संबंधित बातम्या