ajit gavhane in bhosari assembly constituency महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी श्रीफळ वाढविले.  छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.  फुलांची उधळण, रांगोळीच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते.

भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लढाई स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सुरू केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठबळ दिले. महाविकास आघाडीने अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर करत एक प्रकारे भोसरीतील भ्रष्टाचार, दहशतवाद आणि मनमानी कारभाराला लगाम कसण्यासाठी अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा >>> जनता माझ्या पाठीशी, शंकर जगताप, राहुल कलाटे हे माझ्यासाठी आव्हान नाही –  नाना काटे

भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अजित गव्हाणे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत अजित गव्हाणे पदयात्रा सुरू केली. यावेळी तुतारीचा निनाद भोसरीच्या आसमंतात भरून गेला. अजित गव्हाणे यांनी सकाळी सर्वप्रथम लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर नतमस्तक होत भोसरी विधानसभा मतदारसंघात फोफावलेल्या मुजोर कारभाराला लगाम घालण्यासाठी आशीर्वाद घेतले. भोसरी गावठाण भैरवनाथ मंदिर, समस्त गव्हाणे तालीम, समस्त फुगे माने तालीम, मारुती मंदिर , व तत्यानंतर भोसरी उड्डाणपूल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सांगता करण्यात आली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhosari assembly constituency mva ajit gavhane file nomination for maharashtra assembly election 2024 kjp 91 zws