भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत १११ नावांचा समावेश आहे. भाजपाने पीलभीत या ठिकाणाहून विद्यमान खासदार वरुण गांधी यांचा पत्ता कापला आहे. त्यांना २०२४ च्या लोकसभेचं तिकिट देण्यात आलेलं नाही.

वरुण गांधींचा पत्ता कट

उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरहून राघव लखनपाल, मुरादाबादमधून सर्वेश सिंह, मेरठमधून अरुण गोविल, गाजियाबादमधून अतुल गर्ग, अलीगढमधून सतीश गौतम, हाथरसमधून अनुप वाल्मिकी, बदायूंहून दुर्विजय सिंह शाक्य बरेलीहून छत्रपाल सिंह गंगवार, सुल्तानपूरमधून मनेका गांधी, पीलभीतमधून जितिन प्रसाद, कानपूरमधून रमेश अवस्थी, बाराबंकीतून राजरानी रावत, बहराईचमधून अरविंद गोंड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मनेका गांधींना उमेदवारी दिली गेली आहे मात्र वरुण गांधींना तिकिट देण्यात आलेलं नाही.

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

वरुण गांधी अपक्ष लढणार?

वरुण गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत लोकसभा जागेसाठी सत्ताधारी भाजपाकडून त्यांना तिकीट मिळण्याबाबत अनिश्चितता होती. आता यादी आल्यानंतर त्यांचा पत्ता कट झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेश राज्यातील आठ जागांपैकी पिलीभीत ही सर्वात हाय प्रोफाइल जागा आहे, जिथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, ज्यासाठी बुधवारी नामांकन प्रक्रिया सुरू झाली. भाजपा यंदा वरुण गांधींना उमेदवारी देण्याची शक्यता कमी नव्हती, त्या अपेक्षेप्रमाणे त्यांना तिकिट नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे आता वरुण गांधी पिलीभीतमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे.

हे पण वाचा- वरुण गांधी भाजपानं तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून लढणार? नेमकं प्रकरण काय?

सोलापुरातून राम सातपुतेंना तिकिट

सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर महाराज यांच तिकीट कापण्यात आलं आहे. सोलापूरमधून आता राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. राम सातपुते पहिल्या टर्मचे माळशिरसचे आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राम सातपुते यांनी सागर बंगल्यावर येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतो आहे.

विद्यमान खासदारांना संधी

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातूनही पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी देण्यात आली आहे. सुनील मेंढे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते गेले पाच वर्षे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तर अशोक नेते यांची ही लोकसभा निवडणुकीची तिसरी वेळ आहे. अशोक नेते गेले दहा वर्ष गडचिरोलीचे खासदार आहेत.

Story img Loader