Akola and Nagpur Lok Sabha Election Result 2024: विदर्भात फक्त दोन मतदारसंघात कमळ फुललं आहे. तर एका मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. बाकी इतर सात जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात मविआने ८ जागा जिंकल्या आहेत. २०१४ मध्ये भाजपाने विदर्भातल्या दहा जिंकल्या होत्या. तर २०१९ मध्ये ९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र अवघ्या दोन जागांवर भाजपाला यश मिळालं आहे. नितीन गडकरींचा नागपूरमध्ये विजय झाला आहे, तर अकोल्यात अनुप धोत्रे यांचा विजय झाला आहे.

नितीन गडकरी नागपुरात विजयी

अकोल्यात भाजपाचे अनुप धोत्रे ४० हजार मतांनी विजयी झाले आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकरींनी १ लाख ३६ हजारांहून अधिक मतांनी विकास ठाकरेंचा पराभव केला आहे. अमरावतीत १८ हजार १३५ मतांनी काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत त्यांनी नवनीत राणांचा पराभव केला आहे. भंडारा गोंदियात प्रशांत पडोळे विजयी झाले आहेत. त्यांनी २९ हजार १६३ मतांनी भाजपाच्या सुनील मेढेंचा पराभव केला आहे. बुलढाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा विजय झाला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नरेंद्र खेडकरांना हरवलं आहे.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
khamgaon buldhana assembly constituency
खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?

Lok Sabha Election Results Live Updates : ब्रिजभूषण सिंह यांचे चिरंजीव करण भूषण सिंहांचा दीड लाखांच्या मताधिक्याने विजय

चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांचा पराभव

चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला आहे. प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा अडीच लाख जास्त मतं घेतली आहेत आणि भाजपच्या मुनगंटीवार यांचा पराभव केला आहे. गडचिरोली चिमूर मतदारसंघात काँग्रेसच्या नामदेव किरसन यांचा विजय झाला त्यांनी भाजपाच्या अशोक नेतेंना १ लाख ४० हजार मतांनी पराभूत केलं आहे. रामटेकमध्ये काँग्रेसच्या श्यामकुमार दौलत बर्वेंनी
राजू पारवेंचा पराभव केला आहे. ७४ हजाराहून अधिक मतं मिळवत त्यांनी विजय मिळवला. वर्ध्यात अमर काळे यांचा विजय झाला आहे, काँग्रेसच्या अमर काळेंनी भाजपाच्या रामदास तडस यांना ४६ हजार मतांनी पाडलं आहे. तर यवतमाळ वाशिममध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांनी शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव केला आहे. ९३ हजारांचं मताधिक्य मिळवत संजय देशमुख विजयी झाले आहेत.

एकंदरीत हा निकाल पाहिला तर भाजपाच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे आणि तो फोडला आहे. महाविकास आघाडीचे १० पैकी सात उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत. याबाबत आता भाजपातले दिग्गज नेते तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.