Navneet Rana Loses in Election : महाराष्ट्रातील अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झाला आहे. अमरातवीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे उभे होते. या लढतीत वानखेडे यांनी राणांचा पराभव केला. या दोघांमधली ही स्पर्धा खूपच चुरशीची होती. मतमोजणी सुरु झाल्यापासून कधी नवनीत राणा तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर होते पण जनतेने वानखेडेंचीच निवड केल्याचं चित्र स्पष्ट झालं. अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं.

६३ टक्के लोकांनी मतदान केलं

२६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात एकूण ६३.६७ टक्के लोकांनी मतदान केले. अमरावती मतदारसंघातून एकूण ३७ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये होती. यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्याशी वाद असल्याने त्यांनीही नवनीत राणांचा प्रचार केला नाही. त्याचाही फटका राणा यांना बसला.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
What Ashok Chavan Said About Congress?
Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती

नवनीत राणा यांची राजकीय कारकीर्द

२०१९च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला. २०१४मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. अमरावती लोकसभेची जागा अनेकवेळा शिवसेनेकडे गेली आहे. मात्र, येथून भाजपला कधीही विजय मिळाला नाही. नवनीत यांनीही अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, यावेळीही अमरावतीतून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : अमरावतीत भाजपाला मोठा धक्का; नवनीत राणांचा पराभव; निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

राजकारणात येण्यापूर्वी नवनीत राणा यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. पण, २०११मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला चित्रपटसृष्टीपासून ते राजकीय दिग्गजांपर्यंत सगळ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. नवनीत आणि रवी यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

नवनीत राणा यांचे पती अमरावतीचे आमदार आहेत. अशा परिस्थितीत नवनीत यांनी देखील चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात प्रवेश केला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने त्यांना अमरावतीतून तिकीट दिले होते, पण त्यांचा पराभव झाला होता. मात्र, ५ वर्षानंतर २०१९मध्ये त्यांनी अमरावतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून भाजपला पाठिंबा दिला. यावेळीही त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात होत्या, पण त्यांचा पराभव झाला.

Story img Loader