लोकसभा निवडणुकांसाठी मतमोजणी आज पार पडली. काही ठिकाणी मतमोजणी पूर्ण झाली असून काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार, एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला आहे, तर इंडिया आघाडीला २३२ जागा व इतरांना १९ जागा मिळाल्या आहेत. आज जाहीर झालेल्या निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. हा निकाल बऱ्याच बाबतीत अनपेक्षित राहिला. यावेळी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही उमेदवारांना मतदारांनी नाकारलं आहे.

सर्व लोकसभा मतदासंघातून निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या भाजपा नेत्याला पराभव पत्करावा लागला आहे. या नेत्याला मतमोजणीत कमी मतं मिळाली असून त्याला तिसऱ्या जागेवर समाधान मानावं लागलं आहे. सर्वाधिक गुन्हे घोषित दाखल असलेल्या पाच उमेदवारांपैकी एक केरळमधील भाजपा उमेदवार होते. राहुल गांधींविरोधात वायनाड मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणारे के सुरेंद्रन यांच्यावर एकूण २४३ गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी १३९ गुन्हे गंभीर आहेत.

How is the Josh? स्मृती इराणींची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वायनाड मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी विजयी झाले आहेत. त्यांना सर्वाधिक ६ लाख ४२ हजार २९९ मतं मिळाली आहेत. त्यांना एकूण ५९.६९ टक्के मतं पडली आहेत. वायनाडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अॅनी राजा राहिले. त्यांना दोन लाख ८० हजार ५९४ मतं मिळाली. तर, सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असलेले के सुरेंद्रन हे केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना या निवडणुकीत एक लाख ३९ हजार ८६८ मतं मिळाली आहेत.

K Surendran defeated by Rahul Gandhi
वायनाडमधील उमेदवारांना मिळालेली मतं

अमेठीत स्मृती इराणी काँग्रेसच्या नेत्याकडून पराभूत; विजयी उमेदवाराबाबत राहुल गांधी म्हणाले, “भाजपाच्या लोकांना…”

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केरळमधील एर्नाकुलम येथील भाजपाचे उमेदवार डॉ. के. एस. राधाकृष्णन होते. त्यांच्यावर २११ गुन्हे दाखल आहेत. या निवडणुकीत डॉ. के. एस. राधाकृष्णन यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. याठिकाणीही काँग्रेस उमेदवार हिबी इडेन अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. तर, डॉ. के. एस. राधाकृष्णन हे १ लाख ४४ हजार ५०० मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले.