भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल (दि. ७ मे) बंगळुरु येथे विद्यार्थिनींसह ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर ते म्हणाले की, ‘द केरल स्टोरी’ने नव्या प्रकारचा दहशतवाद उघड केला आहे. जेपी नड्डा यांच्यासोबत दक्षिण बंगळुरुचे खासदार तेजस्वी सूर्यादेखील चित्रपटाच्या शोला उपस्थित होते. आयनॉक्स बंगळुरु येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष शोचे आयोजन केले होते. या शोला उभय नेत्यांसह विद्यार्थिनींची उपस्थिती होती. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरून सध्या मोठा गजहब सुरू असून त्या पार्श्वभूमीवर या शोचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकमध्ये मागच्या वर्षीपासून महाविद्यालयात हिजाब बंदी आणि लव्ह जिहाद अशा मुद्द्यांनी मोठे वादळ निर्माण झालेले पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे भाजपाने आपल्या प्रचारात या चित्रपटाचा मोठ्या खुबीने वापर केलेला दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा