Premium

“दुर्दैवाने मोदींच्या हुकुमशाही मानसिकतेमुळे…”, सुब्रह्मण्यम स्वामींची सूचक पोस्ट; म्हणाले, “भाजपानं माझा सल्ला ऐकला असता तर…”

“भाजपा कमीतकमी २२० जागा जिंकेल असा…”, सुब्रह्मण्यम स्वामी यांची पोस्ट चर्चेत

subramanian swamy on modi over loksabha election result
सुब्रह्मण्यम स्वामींनी मोदींना घरचा आहेर दिला आहे.

लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार देशभरात ४०० हून जास्त जागा जिंकू, असा दावा करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाला ४०० नाही तर ३०० जागांचा टप्पा गाठणंही अशक्य दिसत आहे. खासकरून उत्तर प्रदेश, राजस्थान व हरियाणा या तीन राज्यांचे निकाल भाजपाला धक्का देणारे आहेत. महाराष्ट्रातही महायुतीची कामगिरी फार चांगली नाही. या निवडणुकांच्या निकालांवर भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी मोदींची हुकुमशाही मानसिकता असल्याचंही त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. “भाजपा कमीतकमी २२० जागा जिंकेल असा अंदाज मी वर्तवला होता, तो आता समोर आलेल्या २३७ या आकडेवारीच्या अगदी जवळ जाणारा आहे. भाजपानं माझा सल्ला ऐकला असता तर त्यांना ३०० चा आकडा गाठता आला असता. पण, दुर्दैवाने मोदींच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे भाजपा खड्ड्यात गेली आहे, ज्यातून आता पक्षाला बाहेर पडावं लागेल,” अशी सूचक पोस्ट सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

उत्तर प्रदेशसह ‘ही’ दोन राज्ये NDA च्या हातातून निसटणार? निकालांबद्दल महाराष्ट्रातील भाजपा नेते म्हणाले, “नेमकं काय…”

आतापर्यंत हाती आलेले कल पाहता भाजपा २९१ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीचे उमेदवार २३३ जागांवर पुढे आहेत. १९ जागांवर इतर आघाडीवर आहेत. यावर्षी ४०० हून अधिक जागा मिळवणार असा विश्वास भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला होता, पण ही आकडेवारी पाहता मतदारांच्या मनात मात्र बदलाचे वारे वाहत होते, हे स्पष्ट झालं आहे. अनेक दिग्गज भाजपा नेत्यांना काँग्रेसनी पिछाडीवर टाकलं आहे. यात ओम बिर्ला व स्मृती इराणी यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. दोनवेळा अमेठीतून खासदार झालेल्या स्मृती इराणी यांना काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मांनी मागे टाकलं आहे. सुरुवातीपासूनच शर्मा आघाडीवर तर इराणी पिछाडीवर आहेत. निकालांचे कल असेच राहिले तर दोनवेळा केंद्रात मंत्री राहिलेल्या स्मृती इराणी यांना यंदा मात्र संसदेत जाता येणार नाही.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

राजस्थान व हरियाणामध्ये भाजपाने २०१९ मध्ये सर्व जागा जिंकल्या होत्या, पण इथेही चुरशीची लढत पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचे कल पाहता भाजपाला आपले गड राखता येणार नाही असंच दिसतंय. सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने जबरदस्त पुनरागमन केलं आहे, याठिकाणी सपाचे उमेदवार ३५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader subramanian swamy takes dig at modi over loksabha election result hrc

First published on: 04-06-2024 at 13:47 IST

संबंधित बातम्या