Vinod Tawde विरारच्या विवांता या हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे ( Vinod Tawde ) पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजपा आणि बविआ कार्यकर्ते आपापसांत भिडले होते पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला होता. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे ( Vinod Tawde ) यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केल्याचा प्रकार घडला. यानंतर हे दोघंही जण संयुक्त पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने रद्द केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलच्या रुममध्ये किती पैसे मिळाले? काय कारवाई झाली ते पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

नेमकी काय घटना घडली?

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे ( Vinod Tawde ) आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे ( Vinod Tawde ) यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली. सध्या पोलिसांनी हॉटेल सिल केले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. आता पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
mla kshitij thakur
“वसईच्या सनसिटी येथे धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न”, आमदार क्षितीज ठाकूर यांचा आरोप
Paaru
अहिल्यादेवीचा जीव धोक्यात? बंदूक घेऊन किर्लोस्करांच्या घरात एका व्यक्तीने केला प्रवेश, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
flying squad, seizes more than 2 crore rupees, maharashtra assembly election 2024
वसई-विरार पालिका परिसरात सलग दुसर्‍या दिवशी पैशांचा पाऊस, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

हे पण वाचा- Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूर यांचं वक्तव्य, “विनोद तावडेंना सोडून दिलं, एका खोलीत १० लाख, दुसऱ्या खोलीत पाच लाख..”

काय म्हणाल्या पौर्णिमा चौगुले?

“साधारण १२.३० सुमाराला आम्हाला समजलं की भाजपाचे काही कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये आले आहेत. त्या ठिकाणी राडा सुरु झाल्याचंही समजलं ज्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. साधारण सात ते आठ मिनिटांत आणखी पोलीस आले. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर भाजपा आणि बविआचे लोक होते. आम्ही हॉटेल्सच्या रुम पाहिल्या तेव्हा आम्हाला काही पैसे आणि डायरी सापडल्या आहेत. या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात आम्ही दोन गुन्हे दाखल केले आहेत. तसंच तिसरी FIR ही आम्ही दाखल करत आहोत. या ठिकाणी घोषणाबाजी झाली. पण मारामारी किंवा इतर कुठलाही प्रकार घडला नाही. पोलिसांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा पाच ते दहा मिनिटांत पोलीस तिथे पोहचले होते. जे पैसे आणि डायरीज मिळाल्या त्या आम्ही जप्त केल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे.” अशी माहिती पौर्णिमा चौगुले यांनी दिली.

दरम्यान घडल्या प्रकारानंतर विनोद तावडे ( Vinod Tawde ) एकटेच गाडीत बसले. परंतु, पुन्हा त्यांच्या कारमधून ते बाहेर आले आणि हितेंद्र ठाकूरांच्या चारचाकीमध्ये जाऊन बसले. या चारचाकीत क्षितिज ठाकूर चालकाच्या जागेवर बसले होते, तर त्यांच्या बाजूला हितेंद्र ठाकूर आणि मागच्या सीटवर विनोद तावडे बसले होते. त्यांच्या या सवारीबद्दल माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी माध्यमांना सविस्तर उत्तले दिली नाहीत.