BJP Manifesto : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. पुढच्या दहा दिवसात राज्य निवडणुकीला सामोरं जाणार आहे. दरम्यान भाजपाने त्यांचा जाहीरनामा ( BJP Manifesto ) प्रकाशित केला आहे. लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार असं यात जाहीर करण्यात आलं आहे. तसंच इतरही घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

भाजपाच्या जाहीरनाम्यात कुठल्या घोषणा?

लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल.

mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरून रु. १५,०००, तसेच एमएसपीशी समन्वय साधत २० टक्क्यांपर्यंत भावांतर योजना ( BJP Manifesto ) राबविण्यात येईल.

प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.

वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल.

महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार-चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्यात येतील.

येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती ( BJP Manifesto ) तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु. १०,००० विद्यावेतन देण्यात येईल.

जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे काय आहेत?

10 राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पांधण रस्ते बांधण्यात येतील.

अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु१५,००० वेतन आणि विमा संरक्षण ( BJP Manifesto ) देण्यात येईल.

वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.

सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत’ व्हिजन महाराष्ट्र @ २०२९ सादर करण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवण्याचं आमचं धोरण आहे. फिनटेक आणि एआयचं हब म्हणून महाराष्ट्र झालेला दिसेल. या दोन्हीचं सर्वात मोठं केंद्र महाराष्ट्र असेल. तसंच या क्षेत्रात नोकरीच्याही अनेक संधी आहेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंआहे. २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार करण्याचा आमचा संकल्प आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.