उत्तर प्रदेशातल्या एका आमदाराने आज आपल्या एका वादग्रस्त वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं. मुस्लीम द्वेष पसरवणाऱ्या त्यांच्या एका विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यामध्ये ते म्हणाले होते की मी पुन्हा निवडून आलो तर मुस्लीमही आपली गोल टोपी सोडून कपाळाला टिळा लावतील.
NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, या वक्तव्याच्या व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर उत्तर प्रदेशातल्या दोमारीयागंज भागातल्या या आमदाराने सांगितलं की इस्लामिक दहशतवादाला विरोध करण्यासाठी आपण हे भाषण केलं होतं. आमदार राघवेंद्र सिंग या व्हिडीओमध्ये म्हणाले होते, इथे जेव्हा इस्लामिक दहशतवादी होती त्यावेळी हिंदूंना गोल टोपी सक्तीने परिधान करावयास सांगितलं जात होतं. मी हिंदू धर्माच्या अभिमानापोटी कोणताही त्याग करायला तयार आहे. मला असं म्हणायचंय की जर मुस्लीम मला हरवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत आहेत तर मी गप्प राहणार नाही.
राघवेंद्र सिंग हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनी या उजव्या विचारसरणीच्या गटाचे उत्तर प्रदेशचे प्रमुख आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओमध्ये सिंग म्हणाले होते, जर मी पुन्हा आमदार झालो तर जशा गोल टोप्या नष्ट केल्या , तसंच आता मियाँ लोकांना(मुस्लीमधर्मियांसाठी वापरलेला शब्द) टिळा लावावा लागेल.
ते पुढे म्हणाले, पहिल्यांदाच या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर हिंदू उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. मग दोमारियागंजमध्ये सलाम म्हटलं जाईल की जय श्रीराम?
पूर्व उत्तर प्रदेशात काही भाजपा नेत्यांनी मतांसाठी हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करणारी विधानं केल्याचं चित्र आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात मागासवर्गीय समाजातल्या काही नेत्यांनी पक्ष सोडून अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षामध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला.