मयुरा जानवलकर, एक्सप्रेस वृत्त

पणजी: येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल र्पीकर (४०) हे प्रयत्नशील आहेत. राजधानी पणजीतून उमेदवारीसाठी दावेदार आहेत. तीनवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले मनोहर र्पीकर हे  पाच वेळा पणजी मतदारसंघातून निवडून आले होते.

bjp leaders diwali milan function chandrapur
भाजप नेत्याच्या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्याचे जोरगेवार, अहीर यांना निमंत्रण, मुनगंटीवारांना डावलले
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
BJP Manifesto for Jharkhand Assembly Elections 2024
समान नागरी कायदा, ओबीसी आरक्षण; झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा
Jitendra Awad criticism of BJP regarding the murders print politics news
हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ; जितेंद्र आव्हाड यांची टीका
BJPs efforts to stop the Rebellion therefore aim for victory
विजयाचे लक्ष्य, म्हणून बंडखोरी थंड करण्याचे भाजपचे प्रयत्न
BJP succeeded in pacifying Samrat Mahadiks rebellion in Shirala Constituency
शिराळ्यातील बंडोबाना थंड करण्यात भाजपला यश
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार
maharashtra assemly election 2024 Rebellion challenge of Dr Devrao Holi and Ambrishrao Atram for BJP in aheri and gadchiroli Constituency
भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….

केवळ पक्षनेत्यांची मुले आहेत म्हणून उमेदवारांना भाजप उमेदवारी देत नाही, असे  भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

‘भाजपला गोव्यात रुजवण्यासाठी मनोहरभाईंनी खूप काम केले. पण भाजपमध्ये केवळ कुणा नेत्याचा मुलगा आहे म्हणून कुणालाही उमेदवारी मिळत नाही. त्यांनी काम केले असेल, तर त्यांचा विचार करण्यात येतो. या संबंधात मी निर्णय घेऊ शकत नाही. केवळ आमचे संसदीय मंडळ हा निर्णय घेऊ शकते’, असे फडणवीस म्हणाले.

गोव्यात भाजपला सत्तेवर आणण्यात प्रमुख भूमिका बजावणारे र्पीकर हे २००० साली पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते. त्यांच्याशिवाय पक्ष प्रथमच निवडणुकीला सामोरा जात आहे. पर्रिकर हेच गोवा भाजपचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यामुळे आताही राज्यात दौऱ्यावर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या प्रत्येक नेत्याने आपल्या प्रत्येक भाषणात र्पीकर यांचा नामोल्लेख केलेला आहे.

मात्र, र्पीकर यांच्याशिवाय पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही, असे आगामी निवडणुकांपूर्वी पक्ष सोडून गेलेल्या भाजपच्या ४ आमदारांनी म्हटले आहे

र्पीकर यांचे ज्येष्ठ पुत्र असलेले उत्पल हे दिवाळीपासून पणजीत लोकांना भेटत आहेत, मंदिरांना भेट देत आहेत, तसेच राजधानातील फलकांवर झळकत आहेत. भाजप आपल्याला पणजीतून उमेदवारी देईल अशी आपली खात्री असल्याचे त्यांनी नोव्हेंबरमध्ये म्हटले होते. पर्रिकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या बाबुश मोन्सेरात यांनी ही जागा जिंकली. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसमधील जे दहा फुटीर भाजपमध्ये आले त्यात मोन्सेरात यांचा समावेश होता. त्यामुळे आता मोन्सेरात यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. ते प्रचाराला सुरुवातही करणार होते मात्र उमेदवार जाहीर झाला नसल्याने त्यांनी प्रचार सुरु केलेला नाही. पणजीचे प्रतिनिधित्व करावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे उत्पल यांनी नमूद केले.