BJP Candidates List : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर; ९९ जागांसाठी जाहीर केले उमेदवार, कुणाला संधी?

देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

disciplined party bjp is on the verge of indiscipline
भाजपाची यादी जाही (प्रतिकात्मक छायाचित्र)

BJP Candidates List : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

या यादीनुसार, आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

Prashant Jagtap, Prashant Jagtap on Nomination,
जे निष्ठावंत आहेत आणि जे उमेदवार जिंकतील आशांना उमेदवारी दिली जाईल : प्रशांत जगताप
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Rahul Aher, Rahul Aher, BJP MLA Rahul Aher,
कौटुंबिक कलह टाळण्यासाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची माघार
Mahavikas Aghadi Panvel, Panvel candidature,
पनवेलच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच, शिरीष घरत, बाळाराम पाटील, लीना गरड उमेदवारीसाठी इच्छुक
mobile phones to polling booths, Ban on mobile phones,
मुंबई : मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदीच
Prakash Ambedkars Vanchit Aghadi announced Congress Khatib as its candidate from Balapur constituency
काँग्रेसच्या माजी आमदाराला वंचितकडून उमेदवारी; १० उमेदवारांची यादी जाहीर
dispute in maha vikas aghadi over ballarpur constituency seat
काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर ठाकरे, शरद पवार गटांचा डोळा
Chandrapur Assembly Constituency, Brijbhushan Pazare,
चंद्रपूरसाठी भेटीगाठींना जोर

हेही वाचा – मुरबाडमध्ये किसन कथोरेच भाजपचे उमेदवार; पक्षाअंतर्गत विरोधकांची कोंडी, पक्षांतरांच्या चर्चांनाही पूर्णविराम

मराठवाड्यातील १६ जागांसाठी उमेदवार जाहीर

भाजपाने मराठवाड्यातील १६ जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यापैकी भोकर आणि फुलंब्री हे दोन मतदारसंघ सोडले, तर उर्वरित १४ मतदारसंघात भाजपाने विद्यमान आमदारांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांना, तर भोकर मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात गेले अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय भाजपाने संभाजीनगर किनवटमधून भीमराव केराम, नायगावमधून राजेश पवार, मुखेडमधून तुषार राठौड, हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे, जिंतुरमधून मेघना बोर्डीकर, परतूरमधून बबनराव लोणीकर, केजमधून नमिता मुंदडा, निलंगातून संभाजी पाटील निलंगेकर, बदनापूरमधून नारायण कुचे, भोकरदनमधून संतोष दानवे, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, गंगापूरमधून प्रशांत बंब, औसा- अभिमन्यू पवार आणि तुळजापूर राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – दलित असल्याने महायुतीकडून छळ – रश्मी बर्वे; जातप्रमाणपत्र रद्द करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर

पुण्यातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा

भाजपाने पुण्यातील तीन मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना तर पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीत भाजपाकडून १३ महिलांना संधी

भाजपाने नुकताच जाहीर केलेल्या पहिल्या यादीत १३ महिलांना संधी देण्यात आली आहे. श्रीगोंदामध्ये प्रतिमा पाचपुते, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, जिंतूर मेघना बोर्डीकर, गोरेगाव विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून बेलापूर मंदा म्हात्रे, चिखली श्वेता महाले, दहिसर मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिम सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड, फुलंब्री अनुराधा चव्हाण आणि भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार की पाडणार? मनोज जरांगेंची मोठी घोषणा

भाजपाच्या उमदेवारांची संपूर्ण यादी :

खरं तर यंदा भाजपाकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, जी यादी जाहीर झाली आहे, त्यानुसार पक्षाने अनेक आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp releases first list of 99 candidates for maharashtra assembly polls know details spb

First published on: 20-10-2024 at 15:40 IST

संबंधित बातम्या