लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होण्यासाठी १८ ते १९ दिवस राहिले आहेत. १९ एप्रिल ते १ जून अशा सात टप्प्यात देशात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. अशात प्रचाराचा धडाका, मुलाखती सुरु झाल्या आहेत. अब की बार ४०० पारचा नारा भाजपाने दिला आहे. तसंच भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भाजपाचं वॉशिंग मशीन हा एक आरोप विरोधकांकडून कायम केला जातो. भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्या पक्षातल्या लोकांवर झाले आणि ते भाजपात गेले की वॉशिंगमध्ये धुतले जातात, असा आरोप होतो. यावर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी उत्तर देताना बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले पियूष गोयल?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उमेदवारी ज्यांना दिली आहे ते सगळेच खुश आहे. माझ्या मतदारसंघातही कुणाला त्रास झाला, वेदना झाल्या असं नाही. काही जणांना जागा मिळाल्या नाहीत त्यांना फक्त इतकंच वाटतं की आपल्यालाही उमेदवारी मिळायला हवी होती. पण ते काही नाराज नाहीत. मला मुंबईने खूप काही दिलं आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे असं पियूष गोयल यांनी म्हटलं आहे.

वॉशिंग मशीनचा प्रश्न आणि बाळासाहेब ठाकरेंची आठवण

माझ्या घरी १९८४ ला वॉशिंग मशीन आलं. शिवसेनेशी आमची पहिली हात मिळवणी ही माझ्या घरी सायन या ठिकाणी झाली. १९८४ च्या निवडणुकीच्या वेळी बाळासाहेब ठाकरे आले होते. अटलबिहारी वाजपेयी आमच्या घरी आले होते आणि आराम करत होते. त्यावेळी बाळासाहेब आले म्हणून मी अटलजींना बोलवायला गेलो. बाळासाहेब बाहेर बसले होते. त्यावेळी ते भावासह घर बघत होते. त्यावेळी तिथे वॉशिंग मशीन आणि ड्रायर होता. बाळासाहेब ठाकरेंना त्या वॉशिंग मशीनचं कुतूहल वाटलं. त्यांनी ती मशीन उघडून पाहिली, कसं काम करते ते पाहिलं. बाळासाहेब ठाकरेंनी त्याबद्दल माझ्या भावाला काही प्रश्नही विचारले. वॉशिंग मशीनचं आकर्षण बाळासाहेब ठाकरेंना खूप वाटलं होतं. असं उत्तर पियूष गोयल यांनी दिलं आहे. पियूष गोयल यांनी वॉशिंग मशीनच्या प्रश्नावर दिलेलं हे उत्तर चर्चेत आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी भाजपाच्या वॉशिंग मशीनच्या प्रश्नावर उत्तर देताना हा किस्सा सांगितला आहे.

Lok Sabha: महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ?

बाळासाहेब ठाकरे ज्यादिवशी आमच्या घरी आले तेव्हाच माझा भाऊ परदेशातून परत आला होता. त्यावेळी आमच्या घरी वॉशिंग मशीन आणि ड्रायर होता. घरात फिरताना आमची वॉशिंग मशीन बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टीस पडली. तेव्हा वॉशिंग मशीन नवीनच बाजारपेठेत आली होती. त्यामुळे लोकांना या गोष्टीचे अप्रूप होते. बाळासाहेब ठाकरे यांनाही वॉशिंग मशीनचे आकर्षण वाटले. त्यांनी पाहताक्षणीच वॉशिंग मशीन उघडली आणि आतून पाहिली. ही मशीन कशी चालते, याची सगळी माहिती त्यांनी घेतली, असे पियूष गोयल यांनी सांगितले. हा किस्सा सांगून पियूष गोयल यांनी वॉशिंग मशीनचा विषय संपवला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp washing machine piyush goyal divert topic and tell how balasaheb thackeray was get surprised after watching washing machine at my home scj