Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकातील विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय नाट्य घडलं होतं. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले त्याचप्रमाणे कर्नाटकतही भाजपाने सत्ता स्थापन केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. “ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली, तीच गोष्ट महाराष्ट्राला लागू होते”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. ते टीव्ही नाईन मराठीसोबत बोलत होते.

“भाजपा हा पराभव सहन करणार नाही. काहीतरी क्लृप्त्या सुरूच ठेवील. यातून काही निष्कर्ष काढायचे झाले तर दोन्ही ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्रात घोडाबाजार करून सरकार खाली खेचलं. तेव्हा प्रचंड मोठा पैशांचा गैरवापर झाला, चौकशी संस्थांचा गैरवापर झाला, पैशांचं आमिष दाखवलं गेलं. ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली तीच महाराष्ट्राला गोष्ट लागू होते. सरकार स्थापन करण्याकरता जे व्यवहार करावे लागले, तो खर्च केला गेला, आर्थिक व्यवहार केले, याबाबत आमच्या पक्षाने रेटलिस्ट जाहीर केली होती. याला पुरावा नसतो, पण चर्चा आहे. सत्तास्थापनेसाठी खर्च झालेला पैसा वसूल करण्याकरता वसुली सरकार सुरू झालं. कोणतंही कामं करताना सरकार ४० टक्के कमिशनने काम करतंय,ही ऐकिव माहिती नाही. याविषयी एका कंत्राटदाराने पंतप्रधानांना पत्रेही लिहिले. या पत्रात सरकारचं आणि संबंधित मंत्र्याचंही नाव लिहिलं होतं. मात्र दुर्दैवाने त्या कंत्राटदाराने नंतर आत्महत्या केली”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “…तर रक्तरंजित क्रांती करणार”, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची भरसभेत धमकी
maharashtra assembly election 2024 pm modi addresses a public meeting in mumbai
शपथविधीच्या आमंत्रणासाठी मुंबईत; महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधानांचा विश्वास
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची

हेही वाचा >> Karnataka Election Results 2023 : “बजरंग बली, तोडो भाजपा की नली”, कर्नाटकातील निकालावरून विजय वडेट्टीवारांचे सत्तधाऱ्यांवर टीकास्त्र

“काँग्रेसने ४० टक्के कमिशनविरोधात प्रचार सुरू केला. हे महाराष्ट्रालाही लागू आहे”, असं म्हणत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे चव्हाणांनी वाचून दाखवले. बेरोजगारी, भाववाढसह महिलांसाठी अनेक योजनांचे आश्वासन दिल्याने काँग्रेसला यश मिळाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “धार्मिक धुव्रीकरणाचा परिणाम कर्नाटकात झाला नाही. ही महत्त्वाची निवडणूक होती, त्यामुळे त्याचा परिणाम देशभर होणारच. दक्षिणेतील राज्यात भाजपासाठी दरवाजा बंद झाला. आता महाराष्ट्राची निवडणूक भाजपाकरता महत्त्वाची असेल”, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.