Mandi Himachal Pradesh Lok Sabha Election Result 2024: अभिनेत्री कंगना रणौतचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. त्यामुळे कंगनाने आनंद व्यक्त केला आहे आणि कंगना रणौत आता भाजपाच्या खासदार झाल्या आहेत. अभिनेत्री ते खासदार हा तिचा प्रवास नक्कीच चर्चेत राहिला. जेव्हा कंगना रणौत यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट जाहीर झालं तेव्हा त्यांच्यावर काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनैत यांनी अश्लील पोस्ट केली होती. त्यामुळे कंगना रणौत चर्चेत आल्या होत्या. आता कंगना यांनी हिमाचलमधल्या लोकांचे आभार मानले आहेत. कंगना हिमाचलमधल्या मंडी मतदारसंघातून उभ्या होत्या. काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी पराभव केला आहे.

कंगना रणौत यांनी काय म्हटलं आहे?

“मी आमचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ही निवडणूक लढले. त्यांची जी विश्वासार्हता आहे, त्यांची जी गॅरंटी आहे. लोकांनी दाखवलेल्या विश्वासावरच आम्ही आणि आमचा पक्ष तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. तसंच तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळेच हा क्षण मी पाहते आहे. आपण भेटत राहू. मंडी या मतदारसंघाचा विकास मी करणार आहे, तसंच पुढील योजनांबाबत तुमच्याशी यानंतर चर्चा करेन. आता मंडीचं भविष्य उज्वलल असेल.” असं कंगना रणौत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Lok Sabha Election Results Live Updates : राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी, अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणींचा पराभव

कंगनाने मतदानाच्या दिवशी काय म्हटलं होतं?

“मी मतदारसंघातील लोकांमध्ये मतदानाबाबतचा मोठा उत्साह पाहते आहे. मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी एकत्र येऊन मतदान करा. मतदान हा आपला सर्वात मोठा संविधानिक अधिकार आहे. हा लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे. तुम्ही या महापर्वात सहभागी व्हा आणि तुमचं योगदान द्या. तुम्ही जर आमच्या मतदारसंघात पाहिलं तर तिथे एखाद्या सणासारखं वातावरण दिसेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा आवाहन करेन की सर्वांनी या महापर्वात सहभागी होऊन मतदान करावं. लोकशाही हे आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे. मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आपल्या बांधवांनी रक्त सांडलं आहे. त्यामुळेच तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावा आणि आपली लोकशाही आणखी मजबूत करा.”

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : बारामतीत अजित पवार गटाला धक्का; सुप्रिया सुळे यांचा एक लाख मतांनी दणदणीत विजय, निकालाचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

भाजपा खासदार कंगना रणौतने “१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तानला इस्लामिक रिपब्लिक स्टेट बनवलं होतं तर, मग भारताला हिंदू राष्ट्र का नाही बनवलं? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, “आम्ही भारत देशाला आम्ही हिंदू राष्ट्र बनवणार”, अशी घोषणाही तिने अलीकडेच केली आहे. कंगना आता भाजपा खासदार कंगना रणौत म्हणून ओळखली जाणार आहे.

अभिनेत्री म्हणून कंगना रणौत यांनी गँगस्टर या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर तनु वेड्स मनू, फॅशन, क्रिश २, क्वीन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाने उमेदवार जेव्हा जाहीर केले तेव्हा कंगना यांना तिकिट दिलं. कंगना आता भाजपाच्या खासदार आहेत आणि त्या मोठ्या मताधिक्याने मंडी येथून निवडून आल्या आहेत.