देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. प्रचाराचा धुरळा उडत आहे. ज्यांना तिकीट मिळाले, त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे तर काही ठिकाणी अजूनही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली जात आहे. मध्य प्रदेशमध्ये मात्र एक अजब प्रसंग घडला आहे. येथील बालाघाट लोकसभेतून कंकर मुंजरे यांना बहुजन समाज पक्षाचे (बसपा) तिकीट मिळाले. मात्र तरीही त्यांना स्वतःचे घर सोडावे लागले आहे. राजकारणामुळे गावात गट पडतात, हे आपण ऐकले असेल, पण याच राजकारणामुळे कंकर यांच्या घरात दोन गट पडले आहेत. ते कसे? हे या मजेशीर प्रसंगातून जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंकर मुंजरे घराबाहेर पडले

कंकर मुंजरे यांना बसपाने तिकीट दिले असले तरी त्यांची पत्नी अनुभा मुंजरे या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. कंकरही माजी आमदार होते. लोकसभेसाठी त्यांना बसपाकडून तिकीट मिळाले आहे. त्यामुळे दोन पक्षाचे लोक निवडणुकीच्या काळात एका छताखाली राहता कामा नये, असे कंकर मुंजरे यांचे मत आहे. विचारधारेची ही विसंगती टाळण्यासाठी कंकर मुंजरे यांनी निवडणूक होईपर्यंत स्वतःचेच घर सोडण्याचा निर्णय घेतला.

पीटीआय वृत्तसंस्थेने कंकर मुंजरे यांच्याशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, मागच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्र राहिलो होतो. पण आता मतदान होईपर्यंत आम्ही एकत्र राहणार नाही. १९ एप्रिलला पहिल्याच टप्प्यात बालाघाटमध्ये मतदान पार पडेल, त्यानंतर मी घरी जाईल.

जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 

कंकर यांच्या निर्णयामुळे आमदार पत्नी नाराज

मी शुक्रवारी घर सोडले असून मी आता नजीकच एका झोपडीत राहत आहे. जर दोन वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकाच घरात राहत असतील तर लोक याला मॅच फिक्सिंग समजतील, अशी भावना मुंजरे यांनी व्यक्त केली. दरम्यान अनुभा मुंजरे यांना मात्र कंकर यांचा हा निर्णय पटलेला नाही.

अनुभा मुंजरे यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या गौरीशंकर बिसेन यांचा पराभव केला होता. त्यांनी आपले पती कंकर मुंजरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “विधानसभा निवडणुकीवेळी मी बालाघाट विधानसभेतून काँग्रेसच्या तिकीटावर आणि ते गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून परसवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवित होते, तेव्हा तर आम्ही एकत्र राहत होतो. आमच्या लग्नाला ३३ वर्ष झाले असून आमच्या मुलासह आम्ही आनंदाने राहत आलो आहोत.”

“…अशा लोकांचे ‘राम नाम सत्य’ करतो”, योगी आदित्यनाथ यांनी कुणाला दिला सज्जड इशारा?

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना अनुभ मुंजरे म्हणाल्या, मी काँग्रेसशी एकनिष्ठ असून आमच्या पक्षाचे बालाघाटचे उमेदवार सम्राट सारस्वत यांच्या विजयासाठी काम करत आहे. तसेच प्रचारादरम्यान त्या आपल्या विरोधक नवऱ्याच्या विरोधात काहीच बोलत नाहीत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp lok sabha candidate kankar munjare leaves home over difference in ideologies with congress mla wife anubha munjare kvg