देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधी पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभेचा अंदाज येणार आहे. अशातच छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत कुणाचं सरकार येणार? कुणाचा पराभव होणार? याचा मोठा सर्व्हे समोर आला आहे.

‘एबीपी न्यूज सी-वोटर’ने सर्व्हेच्या माध्यमातून ६३ हजार लोकांचं मत जाणून घेतलं आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर, काँग्रेसची सत्ता असलेलं राजस्थान भाजपाकडे जाताना दिसत आहे. तेलंगणात आणि मिझोरममध्ये प्रादेशिक पक्षाचेच सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

50 companies migrated from Chakan MIDC to different states says jayram ramesh
चाकण एमआयडीसीतून ५० कंपन्या परराज्यांत स्थलांतरित! काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; उद्योग संघटनेकडून दुजोरा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Constitution of India
संविधानभान: केंद्रशासित प्रदेशांची व्यवस्था
13 states of the country have the highest number of complaints of atrocity crime news
देशातील १३ राज्यांत अॅट्रॉसिटीच्या सर्वाधिक तक्रारी; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात सर्वाधिक प्रकरणे
UP CM Yogi Adityanath
Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना हरियाणा, जम्मू-काश्मीरच्या प्रचारापासून भाजपाने दूर का ठेवले?
Vidarbha vidhan sabah election 2024
विधानसभेचे पूर्वरंग: विदर्भात सरस तो राज्यात सत्ताधारी
Satej Patil
राज्यात तिसऱ्या आघाडीचे भवितव्य कठीण; सतेज पाटील
Married Man Marries 15 Women in seven Indian States
Crime News : आधुनिक लखोबा! १५ जणींशी लग्न, सात राज्यांमधल्या बायकांना प्रायव्हेट फोटो दाखवून करायचा ब्लॅकमेल

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात थेट लढत होणार आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला ४५ टक्के तर भाजपाला ४३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा काँग्रसचे सरकार येऊ शकते. काँग्रेसला बहुमतासह ४५ ते ५१ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर, दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या भाजपाला ३६ ते ४२ जागा मिळू शकतात.

हेही वाचा : राजस्थानमध्ये ‘या’ जागा ठरणार काँग्रेस आणि भाजपासाठी अटीतटीच्या; २०१८ चा निकाल काय सांगतो?

सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. २०० जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपाला ४५ टक्के तर काँग्रेसला ४२ टक्के मत मिळण्याची शक्यता आहे. भाजपाचे ११४ ते १२४ उमेदवार निवडून येऊ शकतात. तसेच, काँग्रेसला ६७ ते ७७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. राजस्थानमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई दिसत आहे. २३० जागा असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसला ४५ टक्के, तर भाजपाला ४२ टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे ११८ ते १३० उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे भाजपाला ९९ ते १११ जागांवर विजय मिळू शकतो.

हेही वाचा : ‘निवडणूक शिवराज चौहानांची नव्हे, बुधनीच्या जनतेची!’

तेलंगणात ११९ जागांवर भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. सर्व्हेनुसार बीआरएसला ४१ टक्के तर काँग्रेसला ३९ टक्के मते मिळू शकतात. तर, बीआरएसला ४९ ते ६१ आणि काँग्रेसला ४३ ते ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

मिझोरममध्ये ४० जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये मिझोरम नॅशनल फ्रंटला १७ ते २१, काँग्रेसला ६ ते १० आणि झेडपीएम आघाडीचा १० ते १४ जागांवर विजय होऊ शकतो.