Can EVM be hacked? S Chockalingam Answer : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठी मुसंडी मारत बहुमत मिळवलं आहे. या निवडणुकीत राज्यातील २८८ जागांपैकी ५० जागाही काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व त्यांच्या मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीला जिंकता आल्या नाहीत. तर महायुतीने तब्बल २३५ जागा जिंकल्या आहेत. हा निकाल पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. तर, विरोधकांनी मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेवर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मशीनमध्ये कोणीही गडबड करू शकत नाही.

एस. चोकलिंगम म्हणाले, “ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या समजावून सांगायचं झाल्यास यामध्ये एकूण तीन भाग असतात. पहिलं कंट्रोल युनिट, दुसरं बॅलेट युनिट आणि तिसरा भाग म्हणजे व्हीव्हीपॅट मशीन. कंट्रोल युनिटमध्ये एक चिप असते. ज्यामध्ये एक ठराविक प्रोग्राम सेट करून ठेवलेला आहे. कोणीही तो प्रोग्राम बदलू शकत नाही. यामध्ये केवळ मतदानाची आकडेवारी साठवून ठेवली जाते. केवळ उमेदवाराचा नंबर आणि त्याला मिळालेली मते एवढ्याच गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. उदाहरणार्थ एक नंबरचं बटन मतदारांनी किती वेळा, दोन नंबरचं बटण किती वेळा दाबलं. तेवढीच माहिती त्यात साठवलेली असते. या मशीनला उमेदवाराचं नाव, त्याचं निवडणूक चिन्ह माहिती नसतं. परंतु, आपण ज्या उमेदवाराला मत दिलं आहे ते बरोबर आहे की नाही? ते मत त्यालाच मिळालं आहे की नाही हे तपासण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन असते.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Eknath Shinde and Sanjay raut
Sanjay Raut : “एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात”, राऊतांच्या दाव्याने खळबळ; सत्ता स्थापनेचा तिढा वाढणार?
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
Sudhir Tambe On Balasaheb Thorat
Sudhir Tambe : बाळासाहेब थोरातांबाबत सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया

“व्हीव्हीपॅट मशीन म्हणजेच व्होटर-व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल मशीन, आपण ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्यालाच ते मिळालं आहे की नाही हे तपासण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन आणली आहे. यामध्ये उमेदवाराच्या निवडणूक चिन्हासह सर्व माहिती पाहता येते. फक्त व्हीव्हीपॅट मशीनवरच ही माहिती उपलब्ध असते. आपण कंट्रोल युनिटमध्ये कोणतीही माहिती साठवून ठेवू शकत नाही”.

हे ही वाचा >> मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद, शिवसेनेची नेमकी मागणी काय? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

मतदान ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक : चोकलिंगम

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले, कुणी जर प्रश्न उपस्थित केला की कंट्रोल युनिटमध्ये जी चिप आहे ती चिप कोणी उघडून बघितली किंवा त्यात फेरफार केले तर काय होईल? तर मला त्यांना सांगायचं आहे की ही चिप उघडता येत नाही आणि जर उघडण्याचा कोणी प्रयत्न केला तर ती डिसफंक्शनल होते. म्हणजेच ती मशीन आणि चिप दोन्ही बंद पडेल. पुन्हा सुरू करता येणे शक्यच नाही. यासह मतदानासाठी मशीन मतदान केंद्रावर आणल्यापासून मतमोजणी करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आम्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींना, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तिथे बोलावतो. सर्व प्रक्रिया त्यांच्यासमोर करतो. प्रत्येक टप्प्यातील प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्यानंतर प्रतिनिधिंची स्वाक्षरी घेतो आणि पुढच्या कामाला लागतो.