Aaditya Thackeray on Supriya Sule CM Face : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. परंतु, अंतर्गत वर्तुळात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेंच सुरू असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणा असल्याची चर्चा आहे. यावर सर्व प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. ते एबीपी न्यूजच्या शिखर संमेलनात बोलत होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होऊ शकतात, असं सूचक विधान शरद पवार आणि जयंत पाटील यांनी याच कार्यक्रमात केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री नाही झाली असं विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, महिला मुख्यमंत्री झाल्या किंवा नाही झाल्या हे होत राहतं. हा राजकारणाचा भाग झाला. पण सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडत जात आहे. भाजपाची संस्कृती महाराष्ट्रावर लादली जातेय. पण मुख्यमंत्री पदाबाबत जनता ठरवेल. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणारा मुख्यमंत्री होणार असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

महाविकास आघाडी सरकारवर अनेकांचा विश्वास

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, आमच्या सर्व सर्वेक्षणात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंवर अनेकांनी विश्वास ठेवला आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, डॉक्टर, आशा सेविका यांच्यासह अनेक उद्योगपतींचंही आमच्या सरकारवर विश्वास होता. त्यांना माहित होतं की हा माणूस आम्हाला फसवणार नाही, आम्हाला लुटणार नाही.

“ही लढाई आमच्या अस्तित्वाची नाही. पक्ष खरा की खोटा याची नाही. ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मिता आणि अस्तित्वाची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची ही लढाई आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. “भाजपा महाराष्ट्राची राखरांगोळी करायला जात आहे. राख महाराष्ट्रात ठेवून रंगोळी गुजरातला घेऊन जात आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.