आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये चरणजितसिंग चन्नी हे पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असं राहुल गांधी यांनी रविवारी दुपारी जाहीर केल. .यामुळे नवज्योत सिंग सिद्धू या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. परंतु सत्ता आल्यावर त्यांचं महत्त्वाचं स्थान असेल असे संकेतही मिळाले आहेत. चन्नी यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर लगेचच त्यांनी सिद्धू यांच्या पाया पडल्याचं दिसून आलं.
त्यानंतर लगेचच सिद्धू यांनी चन्नी यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे चन्नी एक हात वर उंचावून विजेत्याप्रमाणे अभिवादन केलं. त्यानंतर राहुल गांधी, नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजितसिंग चन्नी या तिघांनीही एकमेकांना मिठी मारत अभिवादन केलं आणि आपले हात उंचावून एकीचा संदेश देत पक्षात कटुता असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
मुख्यमंत्री पदाची उमेदवारी स्विकारल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना चन्नी म्हणाले, सिद्धू जी, तुम्हाला जे करावं वाटतंय तेच तुम्ही करणार. त्यानंतर सिद्धू आपल्या भाषणात म्हणाले, मी राहुल गांधी यांच्या निर्णयाशी सहमत आहे. त्यामुळे मला जरी निर्णय घेण्याची जबाबदारी दिली नसली तरी पुढच्या मुख्यमंत्र्यांना माझा पाठिंबा असेल.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पदासाठी काल चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, काँग्रेसची भावी नेते घडवण्याची एक प्रणाली आहे. चन्नी हे एका गरीब घरातून पुढे आले आहेत. त्यांना गरिबीची जाणीव आहे. तुम्हाला त्यांच्या स्वभावात उर्मटपणा दिसणार नाही. ते जातात, लोकांना भेटतात. चन्नी हे गरिबांचा आवाज आहे.