Chembur Maharashtra Assembly Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. यावेळी चेंबूर विधानसभा मतदारसंघातील लढत अतिशय रंजक आहे. या मतदारसंघात शिंदे गटातील शिवसेनेचे तुकाराम काटे आणि उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवारांव्यतिरिक्त एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र यामुळे उमेदवारांना मतांसाठी शेकड्यांवर घासाघीस करावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. चेंबूर विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत मतमोजणीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या सहा फेऱ्यांमध्ये एकाही उमेदवारीची गाडी आघाडीच्या दिशेने पुढे जाईना असे चित्र आहे, त्यामुळे चेंबूर विधानसभेत नेमका काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तुकाराम काटे हे त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी आणि परिसरात ग्राउंड होल्डसाठी ओळखले जातात, तर प्रकाश फातर्फेकर हे उद्धव गटाचे तगडे उमेदवार मानले जातात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चेंबूरमध्ये शिंदे गटातील शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काटे १४,७५८ मतांनी आघाडीवर आहेत, तर त्यांच्यानंतर काही फरकाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रकाश फातर्फेकर १४,५१४ मतांवर आहेत; तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून दीपकभाऊ निकाळजे, वंचित बहुजन आघाडीकडून आनंद भीमराव जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माऊली थोरवे चार ते पाच हजारांवर आहेत.

Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
The Election Commission's rate card for Delhi Assembly elections sets spending limits on various items, from pens to elephants.
छोले भटूरे ३५ रुपये तर रॅलीतील हत्तीसाठी ६१५० रुपये, दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना किती खर्च करता येणार?

Baramati Election Result 2024 : बारामतीत निकालाआधीच उधळला विजयाचा गुलाल; अजित पवार की शरद पवार कोणत्या गटाला इतका आत्मविश्वास; पाहा Video

चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवारांव्यतिरिक्त एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. बहुजन समाज पक्षाकडून अनिता किरण पाटोळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माऊली थोरवे, वंचित बहुजन आघाडीकडून आनंद भीमराव जाधव आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून दीपकभाऊ निकाळजे. (अ) उतरले होते.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश वैकुंठ फातर्फेकर चांगल्या मतांनी विजयी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा १९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचे उमेदवार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होते.

Chembur (Maharashtra) Assembly Election Results 2024
चेंबुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी २०२४ (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Baramati Election Result 2024 : बारामतीत निकालाआधीच उधळला विजयाचा गुलाल; अजित पवार की शरद पवार कोणत्या गटाला इतका आत्मविश्वास; पाहा Video

मुंबईतील चेंबूर ही जागा काँग्रेसने पाच वेळा जिंकली आहे. आतापर्यंत झालेल्या १३ निवडणुकांमध्ये काँग्रेस, भारतीय जनसंघ, ​​जनता पक्ष आणि शिवसेनेने या जागेवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने ही जागा पाच वेळा जिंकली आहे. २०२४ पर्यंत शिवसेनेने दोनदा, तर भाजपाने तीनदा विजय मिळवला आहे. ही जागा एकदा जनता पक्षाच्या तर एकदा भारतीय जनसंघाच्या खात्यात गेली आहे. काँग्रेस नेते वाडीलाल गांधी हे चेंबूरमधून पहिले आमदार म्हणून निवडून आले होते.

Story img Loader