लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार आपले अर्ज दाखल करत आहेत. यावेळी उमेदवारांनी शपथपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर येत आहे. तेलंगणातील चेवेल्ला मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. तब्बल ४ हजार ५६८ कोटी रुपयांची त्यांची संपत्ती आहे.
कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, विश्वेश्वर रेड्डी यांची प्रामुख्याने जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये शेअर्स, व्यवसाय, होल्डिंग आहे. आता त्यांची संपत्ती अपोलो हॉस्पिटल एंटरप्रायझेस लिमिटेड, पीसीआर इन्व्हेस्टमेंट्स, सिटाडेल रिसर्च आणि अजून काही कंपन्यांचा समावेश आहे. रेड्डी यांची वैयक्तिक मालमत्ता १२५० कोटींची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नी संगीता रेड्डी या अपोलो हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालक असून त्यांची संपत्ती ३२०९.४१ कोटींची आहे. तसेच उर्वरित संपत्ती ही त्यांच्या मुलाकडे आहे.
quiziframe id=30 dheight=282px mheight=417px
हेही वाचा : महायुतीत नाशिकचा तिढा सुटेना, आता छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “आमचा दावा…”
विश्वेश्वर रेड्डी यांनी २०१३ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ‘बीआरएस’मधून सुरुवात केली होती. त्यानंतर ते २०१४ ला चेवेल्ला मतदारसंगातून खासदार झाले होते. मात्र, पुढे त्यांनी बीआरएस पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आता या लोकसभेला विश्वेश्वर रेड्डी यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
विश्वेश्वर रेड्डी यांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये आपली संपत्ती ८९५ कोटींची होती असे सांगितले होते. मात्र, यावेळी त्यांनी ४ हजार ५६८ कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, रेड्डी आणि त्यांच्या पत्नीकडे अनेक कोटींचे सोने आणि हिरे आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्र सांगितले आहे.