Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का? छगन भुजबळ म्हणाले, “आमचा विरोध…”

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेमुळे आम्ही जिंकलो असंही म्हटलं आहे.

What Chhagan Bhujbal Said About Devendra Fad
छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हटलं आहे? (फोटो सौजन्य-छगन भुजबळ, फेसबुक पेज, देवेंद्र फडणवीस, एक्स पेज)

Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) यांच्या महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांमध्ये इतकं घवघवीत यश कुणालाही मिळालं आहे. आता महायुतीचा मुख्यमंत्री होईल हे तिन्ही पक्षांकडून सांगितलं जातं आहे मात्र त्याबाबत कुणाचं नाव नक्की झालं आहे हे सांगण्यात आलेलं नाही. छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे आम्हा निवडून आलो-भुजबळ

जनतेने आम्हाला कौल दिला आहे. कायद्याच्या दृष्टीने जो प्रश्न होता तो सुटला. तसंच कुठल्याही गोंधळाची परिस्थिती आता राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर जे नैराश्य आलं होतं ते दूर करण्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे सगळे यशस्वी ठरले आहेत. या तिघांनी सगळ्या सहकाऱ्यांसह प्रचंड मेहनत घेतली. अजित पवार सकाळी ६ वाजल्यापासून काम करत होते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीही अशीच मेहनत घेतली. तसंच लोकसभेच्या अपयशानंतर जो संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करण्याचं काम या तिघांनीही केलं. आमच्या यशात लाडक्या बहिणींचा वाटा खूप मोठा आहे असंही छगन भुजबळ म्हणाले.लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर वेळेवर सगळ्यांना पैसे मिळाले. अजित पवारांच्या अर्थखात्याने ती जबाबदारी घेतली होती. जे सरकार बोलतं आहे ते करतं आहे याची खात्री लाडक्या बहिणींनाही पटली, तसंच त्यांच्या घरातही ही गोष्ट पटली त्यामुळे आम्हाला चांगलं मतदान झालं असंही छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.

congress leader pawan khera reply on bjp vote jihad
उलेमांचा पूर्वी भाजपलाही पाठिंबा ‘तो व्होट जिहाद नाही का’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वर साक्ष….”; महाराष्ट्राला हे चित्र पुन्हा दिसणार? कोण होणार महायुतीचा मुख्यमंत्री?

मनोज जरांगे माझ्या मतदारसंघात फिरले होते

महिलांचं मतदानही इतर निवडणुकांपेक्षा जास्त झालं आहे. महिला जेव्हा मतदान करतात त्या घरांमधले पुरुषही एकत्रित निर्णय घेऊन मतदान घेतात. शरद पवारांनी माझ्या मतदारसंघात पाडा असं म्हटलं होतं. अभ्यास करुन निर्णय घेतला होता. पण मनोज जरांगेंचं काय काय काम होतं? प्रचार संपायच्या आदल्या दिवशी हाताला सलाईन लावून माझ्याकडे पाहा, माझं काहीही होऊ शकतं आपल्या लेकरबाळांसाठी लढतोय. यांना (छगन भुजबळ) पाडा असं सगळं सांगितलं. माझ्या मतदारसंघात त्याचा परिणाम झाला. मात्र हिंदू, मुस्लिम, दलित सगळे एकवटले आणि मतदान व्यवस्थित केलं आणि मी जिंकलो असंही भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा?

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे का? असं छगन भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले, “आम्ही आमचे नेते अजित पवार यांची सर्वानुमते नेमणूक केली आहे. शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आहेत. भाजपाच्या नेतेपदी कोण ते कळायचं आहे. आमचा काही देवेंद्र फडणवीस यांना विरोध असण्याचं काही कारण नाही. राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवलं की मग आम्ही आपसांत बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल. तसंच कुणाला कशी मंत्रिपदं वाटायची ते ठरेल. कारण आता डिसेंबरचं अधिवेशनही समोर येतं आहे. लवकर निर्णय घ्यावा लागेल” असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाने आम्हाला चांगली साथ दिली आहे असं दिसतं आहे. मनोज जरांगे सतत सांगत होते की देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना पाडा. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात १३२ जागा आल्या हे वास्तव आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhagan bhujbal imp statement about devendra fadnavis cm post what did he say scj

First published on: 24-11-2024 at 16:01 IST

संबंधित बातम्या