महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अनेक दिवसांपासून सुटत नसल्याचे दिसत आहे. या छगन भुजबळ यांनी लोकसभेतून माघार घेतल्यानंतर आता उमेदवारी कोणाला जाहीर होते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. यातच नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळ यांनी लढवावी, यासाठी समता परिषदेने ठराव केला आहे. तसेच समता परिषदेची आज बैठक पार पडली. या बैठकीला छगन भुजबळही उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिक लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा आजही दावा कायम असल्याचे सांगितले.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“मी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यांचे म्हणणे मी ऐकून घेतले. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे जे प्रेम आहे, ते मला मान्य आहे. ते आमचे सहकारी असून त्यांचा मी आदर करतो. राजकारणामध्ये वेगवेगळे फॅक्टर काम करत असतात. वेगवेगळे विषय पुढे येत असतात. वेगवेगळ्या अडचणी पुढे येत असतात. पण मी तो (लोकसभा न लढवण्याचा) निर्णय घेतला आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.

Once again Dushkali Forum in Sanglis politics
सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘दुष्काळी फोरम’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Efforts by BJP and Shiv Sena Shinde group to make Ajit Pawar group leave the Grand Alliance and contest the assembly elections independently
अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह? भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती
Chhagan Bhujbal On Mahayuti
Chhagan Bhujbal : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…
controversy started in mahavikas aghadi over Gopaldas Agarwal s entry in Congress
गोंदिया : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेशापूर्वीच…
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

भुजबळ पुढे म्हणाले, “आयुष्यात मी फक्त एकदा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तिकीट मागितले होते. त्यानंतर मला कधी तिकीट मागण्याची वेळ आली नाही. त्यानंतर मी अनेकांना तिकीट वाटत गेलो. यावेळी दिल्लीच्या काही नेत्यांची मागणी होती, तुम्ही उभे राहा. त्यामुळे आपण तयारीला लागलो होतो. पण त्यांच्यासमोर काही अडचणी आल्या असतील. त्यामुळे तीन-चार आठवड्यानंतर सगळे प्रश्न सुटले पण नाशिकचा तिढा सुटत नाही”, असे भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा : “मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो”; ‘या’ नेत्याने दिला इशारा

भुजबळ नाराज आहेत का?

छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे, यावर प्रश्नावर भुजबळ म्हणाले, “मी कसा नाराज असेल? आयुष्यात अनेक गोष्टी येतात आणि अनेक गोष्टी जातात. जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया, जो खो गया उसको भुला कर चला गया, मै जिंदगी का साथ निभाता चला गया”, अशी शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

नाशिकच्या जागेबाबत आमचा दावा?

“नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम आहे. आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, महिलांमध्ये जिल्हाध्यक्षा बलकवडे मॅडम यांच्यासह अनेक उमेदवार आहेत. तसेच भाजपाकडेही अनेक उमेदवार आहेत. भाजपाकडे तीन आमदार, दिनकर पाटील, शांतिगिरी महाराज तर शिंदे गटाकडे हेमंत गोडसे, अजय बोरस्ते असे अनेक आहेत. मात्र, महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी आपण काम करणार आहोत”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेमंत गोडसेंनी गोड बातमी द्यावी

“महायुतीमधील तिन्ही पक्षांकडे निवडणूक लढू शकतात असे अनेक उमेदवार आहेत. मात्र, लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. कारण विरोधी उमेदवाराच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे.” दरम्यान, हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचे म्हणणे आहे की, त्यांचे नाव फायनल झाले असून लवकरच घोषणा होईल. त्यावर छगन भुजबळ म्हणाले, “गोडसेंनी आम्हाला गोड बातमी द्यावी.”