Chhattisgarh Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. परंतु, दुपारनंतर मतांचा कल काही प्रमाणात भाजपाच्या बाजूने झुकू लागल्याचं दिसत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार छत्तीसगडमधील ९० पैकी ५५ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३२ आणि बहुजन समाज पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील काँग्रेसचं विद्यमान सरकार पडून तिथे भाजपाचं सरकार येईल असं चित्र आता दिसू लागलं आहे. त्याचबरोबर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेदेखील सध्या पिछाडीवर आहेत. छत्तीसगडमधील निकाल काँग्रेससाठी खूप धक्कादायक मानला जात आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता, भारतीय जनता पार्टीवर महादेव कृपा असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. कथित महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणामुळेच छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं नुकसान झाल्याची चर्चा आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांची नावं पुढे आली होती. या प्रकरणावरून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्राचारादरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसेच भाजपाच्या सर्व प्रचारकांनी आणि कार्यकर्त्यांनी महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. यामुळे निवडणुकीत काँग्रेसविरोधात मतदान झाल्याची चर्चा आहे.

Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी
Markadwadi EVM Issue.
Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका

महादेव बेटिंग अ‍ॅपसह भाजपाने छत्तीसगडमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत प्रचार केला होता. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपाने काँग्रेसविरोधात इतक्या आक्रमकपणे प्रचार केला की, काँग्रेसला त्याविरोधात काहीच करता आलं नाही. या प्रकरणाचे धागेदोरे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी जोडले गेल्याने काँग्रेस आणखीनच पिछाडीवर गेली. त्याचेच परिणाम निवडणुकीच्या निकालांत दिसून येत आहेत.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे स्वतः त्यांच्या पाटण या मतदारसंघात पिढाडीवर आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार बघेल हे ४०० हून अधिक मतांनी मागे पडले आहेत. दुसऱ्या बाजूला छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव हे अंबिकापूर मतदारसंघात १,६२३ मतांनी मागे आहेत. या मतदारसंघात भाजपा उमेदवार राजेश अग्रवाल यांनी मुसंडी मारली आहे.

हे ही वाचा >> “मर्द कोण हे कळलं का?” भाजपाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; राहुल गांधींवर टीका करत म्हणाले, “पनवती…”

भूपेश बघेल यांच्यावर ५०८ कोटी रुपये घेतल्याचा आरोप

‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना निवडणुकीच्या काळात तब्बल ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला होता. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले होते. ऐन निवडणुकीच्या प्रचारकाळात हे प्रकरण समोर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बघेल यांना लक्ष्य केलं. त्यापाठोपाठ ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील आरोपी शुभम सोनीनं मुख्यमंत्री बघेल यांच्यावर गंभीर आरोप केले. मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं शुभम सोनीला फरार घोषित केलं आहे. शुभम सोनीच्या सांगण्यावरून असीम दास हा कथितरित्या भूपेश बघेल यांना पैसे पोहचवत होता. शुभम सोनीनं दुबईतून एक व्हिडीओ प्रसारित हे दावे केले आहेत. असीम दास हा ईडीच्या ताब्यात असून त्याने गुन्हे कबूल केले आहेत.

Story img Loader