Chhattisgarh Assembly Elections first phase : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीनिमित्त आज (दि. ७ नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यासाठी ९० पैकी २० मतदारसंघात मतदान होत आहे. आदिवासी बहुल असलेल्या या जागांवर सत्ताधारी काँग्रेस स्वतःचे वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणार आहे. आदिवासी भाग काँग्रेसचा मागच्या निवडणुकीत बालेकिल्ला राहिला आहे. २० पैकी १२ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या बस्तर क्षेत्रात मोडतात, तर उरलेल्या आठ जागा दुर्ग क्षेत्राच्या आसपासच्या परिसरातील आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २० पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आणखी दोन जागा मिळवून ही संख्या १९ वर पोहोचली होती. राजनंदगाव ही फक्त एक जागा भाजपाकडे आहे. या ठिकाणी आमदार आहेत भाजपाचे मातब्बर नेते आणि तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले रमन सिंह.

प्रचारातील प्रमुख मुद्दे कोणते?

या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या कल्याणकारी योजनांना प्रचाराचा मुद्दा केले आहे, तर भाजपाने भ्रष्टाचार आणि धर्मांतरसारख्या मुद्द्यांना हात घातला. बस्तर भागात बेरोजगारी हा मोठा विषय आहे. सरकारी नोकरभरती केलेली नाही आणि नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना डावलून बाहेरून आलेल्यांना स्थान दिले जात असल्याबाबतची नाराजी लोकांमध्ये आहे. जाणकारांच्या माहितीनुसार २०१९ पासून बस्तरमधील बेरोजगारी सातत्याने वाढत आहे, त्याचवेळी उर्वरित छत्तीसगडमधील बेरोजगारीचा दर मात्र घसरत आहे. सरकारच्या वतीने मात्र असा दावा केला जात आहे की, नक्षल प्रभावित परिसरातून येथील आदिवासी युवक बाहेर पडत आहेत आणि मुख्य प्रवाहात येऊन काम करत आहेत, हे एक चांगले चिन्ह आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
ballarpur assembly, abhilasha gavture, sudhir mungantiwar, santosh singh ravat,
गावतुरे यांच्या बंडखोरीने बल्लारपूरमध्ये काँग्रेस अडचणीत
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

हे वाचा >> Chhattisgarh : नक्षलग्रस्त बस्तरच्या अबूझमाडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान; निवडणूक यंत्रणेसमोर आव्हान?

राहुल गांधी यांनी ४ नोव्हेंबर रोजी जगदलपूर येथील सभेत पेसा कायद्याला (PESA law) आणखी बळकट करण्याचे वचन दिले, हा एक आणखी मोठा विषय आहे. जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी ग्राम सभेची परवानगी अत्यावश्यक असेल, असे राहुल गांधी म्हणाले. मात्र, हरम राज पक्षाचे नेते विनोद नागवंशी म्हणाले की, राहुल गांधी यांनी फसवे वचन दिले आहे. काँग्रेसचे माजी नेते अरविंद नेतम यांचा सर्व आदिवासी समाज या आदिवासी संघटनेच्या पुढाकारातून हरम राज पक्षाची स्थापना झालेली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या पक्षाला भाजपाची ‘बी’ टीम असल्याची टीका केली आहे.

धर्मांतर हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा असून भाजपा आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष यावरून एकमेकांवर टीका करत आहेत.

आदिवासी बहुल भागात काँग्रेसचे वर्चस्व

२०१३ सालच्या निवडणुकीत या २० मतदारसंघापैकी ८ ठिकाणी भाजपाने आणि १२ ठिकाणी काँग्रेसने विजय मिळविला होता. मात्र, २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागांवर विजय मिळवून आदिवासी क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दंतेवाडा आणि राजनंदगाव या दोन जागी भाजपाने विजय मिळविला; तर खैरागड मतदारसंघात जनता काँग्रेस छत्तीसगड-जोगी (JCC-J) पक्षाच्या अजित जोगी यांनी विजय मिळविला होता. काँग्रेसचे माजी नेते आणि छत्तीसगडचे प्रथम मुख्यमंत्री अजित जोगी यांनी हा पक्ष २०१६ साली स्थापन केला होता. २०२० साली त्यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती.

निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने काँग्रेस सरकारवर आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. मात्र, बघेल यांनी सर्व आरोप फेटाळून लावत असताना सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष नसल्याचे सांगितले.

हे वाचा >> छत्तीसगडमध्ये भाजपाकडून दंगलखोर, धर्मांतरविरोधी उमेदवारांना तिकीट; काँग्रेसविरोधात हिंदुत्वाचा प्रयोग

महादेव बेटिंग ॲप, प्रचारातील मुख्य मुद्दा

मागच्या शनिवारी (४ नोव्हेंबर) दुर्ग येथे जाहीर सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघेल आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. “या लोकांनी महादेव नावालाही सोडले नाही”, (महादेव बेटिंग ॲपचा संदर्भ) अशी टीका मोदी यांनी केली. महादेव बेटिंग ॲप या ऑनलाइन जुगार चालविणाऱ्या प्रवर्तकांकडून काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना ५०८ कोटींची लाच मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. मोदी यांनी याच आरोपाचा संदर्भ घेऊन भूपेश बघेल यांच्यावर टीका केली. केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले की, महादेव बेटिंग ॲपसह २२ बेकायदा बेटिंग ॲप आणि संकेतस्थळांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

बघेल यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. निवडणूक डोळ्यासमोर असल्यामुळे राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेले हे आरोप आहेत. तसेच केंद्र सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत, असा पलटवार बघेल यांनी केला.

कवर्धा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री मोहम्मद अकबर यांना यावेळी भाजपाने चांगलेच बेजार केले आहे. २०२१ साली उसळलेल्या दंगलीबाबत त्यांना जबाबदार धरण्यात आलेले असून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. २०१८ साली अकबर विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. भाजपाचे स्टार प्रचारक आणि हिंदुत्वाचा चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कवर्धा मतदारसंघात अकबर यांच्याविरोधात भाजपाच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला.

आणखी वाचा >> ‘नोटा’ पर्याय निवडणुकीतून काढून टाका; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

भाजपा आणि काँग्रेस पक्षाखेरीज ‘सर्व आदि दला’ने पहिल्या टप्प्यात नऊ उमेदवार दिले आहेत. तर ‘हमर राज पक्षा’ने पहिल्या टप्प्यात आठ उमेदवार उभे केले आहेत. ज्यामुळे काँग्रेस पक्षाच्या मतांमध्ये विभागणी होईल, असा अंदाज बांधला जात आहे. त्याशिवाय सीपीआय, बसपा, आप आणि जेसीसी-जे अशा पक्षांनीही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मात्र या पक्षांना या प्रदेशात फारसा जनाधार नाही.