Chhattisgarh Assembly Elections first phase : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीनिमित्त आज (दि. ७ नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यासाठी ९० पैकी २० मतदारसंघात मतदान होत आहे. आदिवासी बहुल असलेल्या या जागांवर सत्ताधारी काँग्रेस स्वतःचे वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणार आहे. आदिवासी भाग काँग्रेसचा मागच्या निवडणुकीत बालेकिल्ला राहिला आहे. २० पैकी १२ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या बस्तर क्षेत्रात मोडतात, तर उरलेल्या आठ जागा दुर्ग क्षेत्राच्या आसपासच्या परिसरातील आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २० पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आणखी दोन जागा मिळवून ही संख्या १९ वर पोहोचली होती. राजनंदगाव ही फक्त एक जागा भाजपाकडे आहे. या ठिकाणी आमदार आहेत भाजपाचे मातब्बर नेते आणि तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले रमन सिंह.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा