Chinchwad Assembly Constituency Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली होती. खरं तर २०२४ ची विधानसभा निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असणार होती. पुण्यातील चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly Constituency) मतदारसंघही राज्याच्या राजकारणात कायम चर्चेस्थानी राहिला. या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या विद्यमान आमदार आहेत. मात्र, गेल्या दोन तीन वर्षांत राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणातही त्याचा परिणाम पाहायला मिळाला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडची जनता कोणाला कौल देते? महायुतीला की महाविकास आघाडीला? की अजून इतर कोणत्या पक्षाला? हे आता निवडणुकीनंतर स्पष्ट झालं आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत घडामोडी पाहायला मिळाल्या. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. आता चिंचवडच्या विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. यातच भाजपातील काही माजी नगरसेवकांनी जगताप कुटुंबातील उमेदवार देण्यास विरोध केल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपामधील अंतर्गत राजकारण उफाळून आल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र, पक्षाने शंकर जगताप यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. तसेच या निवडणुकीत राहुल कलाटे यांचा पराभव झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या स्थानिक काही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी दबाव तंत्राचा वापर करत चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. पक्षातील इच्छुकांनाच उमेदवारी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे चिंचवड विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. असं असलं तरी विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याचा महायुतीचा फॉर्म्युला होता. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार उमेदवारी जगताप कुटुंबातील व्यक्तीलाच मिळाली.
दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आता राहुल कलाटे आणि महायुतीकडून शंकर जगताप हे निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते, अखेर या भाजपाचे शंकर जगताप यांचा विजय झाला.
हेही वाचा : पिंपरी : आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेतील ४३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभय?
दरम्यान, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण जगताप आणि राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत झाली होती. मात्र, लक्ष्मण जगताप यांनी ३८ हजार ४९८ मतांनी बाजी मारत राहुल कलाटे यांचा पराभव केला होता. मात्र, लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ मध्ये निधन झाले. त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या होत्या. पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini jagtap), राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्याच तिरंगी लढाई झाली होती.
मतदारांची संख्या
चिंचवड विधानसभा मतदारसंघात २०१९ साली मतदारांची संख्या ५,१६,८३६ एवढी होती. तसेच २०२३ च्या पोटनिवडणुकीत मतदारांची संख्या ५,६६,४१५ एवढी होती. पुरुष मतदारांची संख्या ३,०१,६४८ तर महिला मतदारांची संख्या २,६४,७३२ एवढी होती.
चिंचवड मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत किती टक्के मतदान झालं?
चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यात सर्वात मोठा आहे. चिंचवडमध्ये एकूण ६,६३,६२२ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार ३,४८,४५०,महिला मतदार ३,१५,११५ असून तृतीयपंथी ५७ मतदार आहेत. त्यापैकी सकाळी ११ वाजेपर्यंत पुरुष ६५४३२, महिला ४७२१४ आणि इतर १ अशा ११२६४७ मतदानाचा हक्क बजाविला आहे. टक्केवारी १६.९७ झाली आहे. चिंचवड मतदारसंघात ५५.४ टक्के मतदान झाले.