राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाने काँग्रेसला चारीमुंड्या चित कर स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या गोटात पराभवाचं विश्लेषण करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असताना भाजपा व मित्रपक्षांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या तीन राज्यांमधील पराभवामुळे काँग्रेसचा तेलंगणामधला विजय काहीसा झाकोळून गेला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील मित्रपक्ष मोदींवर व भाजपावर स्तुतिसुमनं उधळत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या कौतुकाबरोबरच राहुल गांधींनाही लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदेंनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भाजपाच्या या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, देशासाठी केलेलं काम आणि गृहमंत्री अमित शाह यांचं नियोजन यामुळे निवडणुकांमध्ये भाजपा व एनडीएला विजय मिळाला आहे. आत्तापर्यंत लोक म्हणत होते घर घर मोदी. आता या निवडणुकांमध्ये मन मन मोदी असल्याचं सिद्ध करणारा निकाल आपण पाहिला. अनेक लोक म्हणत होते की मोदींचा करिश्मा संपला, निवडणुकीत भाजपा पराभूत होईल. मोठं बदनामीचं षडयंत्र केलं गेलं. पण शेवटी हे निकाल जनतेच्या हातात असतात. जनता जनार्दन हेच सर्वस्वी असतं. या जनतेनं निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव, पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर!

राहुल गांधींवर टीका

दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी थेट राहुल गांधींवर टीकास्र सोडलं. “काँग्रेसच्या राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली. पण विदेशात जाऊन भारत तोडो करण्यासाठी भारताची बदनामी ते करत होते. पंतप्रधानांची बदनामी करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला. त्यांची जागा दाखवली. हे लोकांना मान्य नसतं. राजस्थानमध्ये राहुल गांधींनी गेल्या निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की १० दिवसांत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. पण ५ वर्षांत ते पाळलं नाही. तिथले मतदार मला सांगत होते. त्यांचेच उपमुख्यमंत्री व मंत्री निवडून आल्यानंतर कर्नाटक सरकारकडे योजना पूर्ण करायला पैसे नाहीत असा खुलासा करत होते”, असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

‘घरी बसलेल्या नेत्यांना मतदार आता कायमचं…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

“येत्या निवडणुकीत काँग्रेसचं नावही राहणार नाही”

“या निवडणुकांना इंडिया आघाडी सेमीफायनल म्हणत होते. आता ही लोकसभेची फायनलच झाली. आता काय झालं? येणाऱ्या निवडणुकांमध्ये देशातली जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. २०२४ ला आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोदीजी तोडतील आणि पुन्हा पंतप्रधान होतील. येत्या निवडणुकीत काँग्रेसचं नामोनिशाण राहणार नाही”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde slams rahul gandhi on five state election results 2023 bjp win pmw
Show comments