Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे मतदारसंघातील दौरे वाढले असून आढावा घेतला जात आहे. खरं तर २०२४ ची विधानसभा निवडणूक अनेक बड्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. आता मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघ देखील राज्याच्या राजकारणात कायम चर्चेस्थानी राहिला. या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे नेते तथा विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे आमदार आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणात झालेल्या बदलानंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा विधानसभा मतदारसंघावर यंदा कुणाचा झेंडा फडकणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

कारण विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात तगडं आव्हान निर्माण झाल आहे. यामध्ये कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्येही चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. मुंबईमधील दक्षिण मुंबई हा बहुभाषिक लोकसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात कुलाबा विधानसभा मतदारसंघ येतो. कुलाबा मतदारसंघात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. या परिसरात गुजराती आणि मराठी भाषिक मतदार आहेत. तसेच या मतदारसंघात देखील अनेक प्रश्नांच्या समस्या आहेत. जुन्या चाळींचा प्रश्न, अरुंद रस्ते तसेच वाहतुकीच्या प्रश्नासह आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे हे प्रश्न देखील विधानसभेच्या निवडणुकीत महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर स्थानिक राजकारणातही राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे याचा काही परिणाम होऊ शकतो. तसेच बदललेल्या राजकीय समीकरणाचा फटका कोणाला बसणार? आणि फायदा कोणाला होणार? हे निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
chimur vidhan sabha constituency kirtikumar bunty bhangdiya vs congress satish warjukar
चिमूरमध्ये थेट लढतीमुळे कीर्तीकुमार भांगडिया अडचणीत
Mulik joins Tingre for campaign in Wadgaon Sheri seat
आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !
maharashtra assembly poll 2024 rajendra raut and dilip sopal supporters clash barshi assembly elections
बार्शीत राजेंद्र राऊत – सोपल गटात गोंधळ; दोन्ही गटांचे आरोप-प्रत्यारोप, तणाव
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”
Assembly Election 2024, Doctor, Manifesto
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टरांचा जाहीरनामा! राजकारण्यांकडे केलेल्या मागण्या जाणून घ्या…

हेही वाचा : Vikhroli Assembly constituency : पक्षफुटीचं राजकारण होणार की भाषिक वाद रंगणार? हॅटट्रीकसाठी राऊतांसमोर महायुतीचं आव्हान!

कुलाबा विधानसभा मतदारसंघ सध्याच्या परिस्थितीनुसार, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत हणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार असलेले ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या लढतीकडे आता अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

कुलाबा मतदारसंघाचं राजकीय गणित कसं आहे?

दक्षिण मुंबईत अर्थात कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते राज पुरोहित यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर दक्षिण मुंबईत भाजपात दोन गट पडल्याचं बोललं जातं. २००९ व २०१४ मध्ये राज पुरोहित यांना कुलाबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पण २००९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता, तर २०१४ मध्ये ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज पुरोहित यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, भाजपाने त्यांचा पत्ता कापत राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. कुलाबा विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी विजय मिळवला होता, तर काँग्रेसच्या अशोक अर्जुनराव जगताप यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून विद्यामान आमदार ॲड. राहुल नार्वेकर पुन्हा वर्चस्व राखणार की उलटफेर होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदारांची संख्या

मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाने जिंकला होता. राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे अशोक अर्जुनराव जगताप यांचा पराभव केला होता. कुलाबा मतदारसंघामधून २०१९ मध्ये राहुल नार्वेकरांना ५७ हजार ४२० मते मिळाली होती, तर काँग्रेसचे अशोक जगताप यांना ४१ हजार २२५ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत एकूण २,६५,४७० मतदार होते. त्यापैकी १ लाख ५४ हजार ३८४ पुरुष, तर १ लाख ११ हजार ८६ महिला मतदार होते.

कोण आहेत राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकर यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विविध पदांवर काम केलेले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत. व्यवसायाने वकील असणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीला शिवसेनेत काम केले. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना विधान परिषदेवर पाठवले. २०१४ ते २०१९ या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. सप्टेंबर २०१९ मध्ये राहुल नार्वेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. ते भाजपाचे माध्यम प्रभारीही (मीडिया इन्चार्ज) राहिले आहेत. २०१९ मध्ये कुलाबा विधानसभा मतदारसंघातून नार्वेकर आमदार झाले.