लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (४ जून) लागणार आहे. एव्हाना झालेल्या मतमोजणीमधून दिसलेल्या कलांमध्ये इंडिया आघाडीला ३०० तर इंडिया आघाडीला २२५ जागा मिळणार असल्याची शक्यता दिसते आहे. मतमोजणीअंती या कलांमध्ये बदल होण्याची शक्यता असली तरीही इंडिया आघाडी दमदार पुनरागमन केल्याचे चित्र आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीने आतापासूनच हालचाली सुरु केल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले की, “सध्याची आकडेवारी पाहता, आम्ही जो महाविकास आघाडीचे ३२-३३ जागांचा अंदाज व्यक्त केला होता तो अंदाज खरा ठरतो आहे. जागा वाटापमध्ये गोंधळ झाला नसता तर एक-दोन जागी पराभव झाला नसता. महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष खूप चांगल्या प्रकारे समन्वय निर्माण झाले आहे. नेत्यांपासून तळगळापर्यंत सर्वांनी एकमेकांना सहकार्य केले.”
इंडिया आघाडीचे नेते दिल्लीमध्ये भेटून पुढील रणनिती ठरवणार आहे का आणि सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देणार आहे का याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,” ‘एनडीए’ आघाडीतील काही घटक पक्षांना घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करू शकतो. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले जाऊ शकते.”
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “लोकशाहीमध्ये आपल्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी सत्तेत यावे लागते. त्यासाठी काही समविचारी पक्षांच्या लोकांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. इंडिया आघाडी आणि एनडीएला मिळत असलेल्या जागांमध्ये फार मोठा फरक दिसत नाही. त्यामुळे, चंद्राबाब नायडू आणि नितीश कुमार यांचे दोन मोठे पक्ष इंडिया आघाडीमध्ये आणण्यासाठी निमंत्रण दिले जाऊ शकते. त्यांनी काँग्रेसबरोबर काम केले आहे ते डाव्या विचाराचे कार्यकर्ते आहे. जर ज्यांना निमत्रंण दिले तर त्यांनाबरोबर घेऊन एक मोठी आघाडी तयार होईल, असा प्रयत्न करण्यास हरकत नसावी. कारण, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी आणि अमित शहा देखील हाच प्रयत्न करतील. ते देखील आमच्या घटक पक्षांपैकी कोणाला तरी फोडण्याचा प्रयत्न करतील.”
हेही वाचा – “आमच्या सोबत आल्यास उपपंतप्रधान पद देऊ…” शरद पवार यांचा नितीश कुमार यांना फोन?
नितीश कुमार यांना उपपंतप्रधानपदाचा प्रस्ताव?
सत्तास्थापनेसाठी एनडीए आघाडीतील पक्षांना आपलेसे करण्याचा प्रयत्न आता इंडिया आघाडीने सुरु केला असून आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आघाडीमध्ये प्रवेश केलेल्या नितीश कुमार यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून केला जात आहे. त्यासाठी नितीश कुमार यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन करुन हा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती समोर आलीआहे. दुसरीकडे, सत्तास्थापनेसाठी मदत केल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ, असे आश्वासन टीडीपी पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना दिले असल्याची माहिती आहे. मात्र, अशा प्रकारचे फोन मी कुणालाही केले नसल्याचे शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? बिहारमध्ये घडामोडींना वेग; भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला दिला नकार!
भाजप पुन्हा मोदींनाच नेतृत्व देणार का?
देशातील जनतेने नरेंद्र मोदीच्या विरोधात कौल दिला आहे. मागच्या निवडणूकीमध्ये भाजपला स्व-बळावर २७२ जागा मिळाल्या होत्या यावेळी त्या मिळालेल्या नाहीत.त्यामुळे हा नरेंद्र मोदींचा वैयक्तिक पराभव आहे. भाजप सरकार स्थापन करणार असेल तर प्रश्न असा की,’पक्ष आणि पक्षातील नेते पुन्हा नरेंद्र मोदी यांनाचा पुन्हा नेता म्हणून निवडतील की दुसरा कोणत्या पर्यायाचा निवडतील कारण मोंदीना ७५ वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे याचा विचारही केला पाहिजे.”