Priyanka Gandhi : मोठी बातमी! वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधींना उमेदवारी जाहीर

काँग्रेसने वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी वाड्रा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Priyanka Gandhi
वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधींना उमेदवारी जाहीर, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Priyanka Gandhi : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात एका टप्प्यात तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीच्याबरोबरच केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड आणि पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. काँग्रेसने वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी वाड्रा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

वायनाड लोकसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. या दोन्हीही मतदारसंघामधून त्यांचा विजय झाला होता. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान, काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी याआधीच जाहीर केलं होतं की, वायनाडमधून प्रियंका गांधी या निवडणूक लढवतील. त्यामुळे आता प्रियंका गांधी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे वायनाडच्या या पोटनिवडणुकीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

Satyasheel Sherkar of Congress is the candidate of NCP Sharad Pawar party in Junnar
जुन्नरमध्ये काँग्रेसचे सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार ?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
asaduddin owaisi on congress haryana defeat
हरियाणातील पराभवानंतर असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका; म्हणाले, “स्वतःच्या नाकर्तेपणामुळे…”
Prakash Ambedkars Vanchit Aghadi announced Congress Khatib as its candidate from Balapur constituency
काँग्रेसच्या माजी आमदाराला वंचितकडून उमेदवारी; १० उमेदवारांची यादी जाहीर
Shagun Parihar won election
Shagun Parihar : दहशतवादी हल्ल्यात वडील गमावलेल्या शगुन परिहार विजयी, मुस्लीमबहुल मतदारसंघाचं नेतृत्त्व तरुणीच्या हाती!
Resolution regarding the candidacy of Congress in Shivajinagar Assembly Constituency meeting Pune print news
सनी निम्हण यांचा काँग्रेस प्रवेश अवघड? काँग्रेस निष्ठावंतांचा विरोध; संधिसाधूंना उमेदवारी न देण्याचा ठराव
assembly election 2024 review of Congress Then and Now
भूतकाळाच्या चष्म्यातून… काँग्रेस : तेव्हाची आणि आताची
rahul gandhi kolhapur
राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यात पुन्हा संविधानावर भर

हेही वाचा : Maharashtra Elections : ‘हरियाणापासून शिका,’ पाय जमिनीवर ठेवा; राहुल गांधींचा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना इशारा

वायनाडमधून प्रियांका गांधी का?

वायनाडबरोबर आपले भावनिक संबंध असल्याचा दावा राहुल गांधींनी याआधी केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत खराब कामगिरी केली होती आणि स्वत:राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पराभूत झाले होते, तेव्हा केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघानेच राहुल गांधींना तारले होते. त्यावेळी केरळमधील काही काँग्रेस नेत्यांनी देखील काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (UDF) राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये इतके यश मिळण्यामागे राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवणे हे कारण असल्याचे म्हटले होते.

केरळमध्ये काँग्रेसला असा विश्वास आहे की, सत्ताधारी पिनाराई विजयन सरकारविरोधात जनमताचा कौल असून लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे. अशा पार्श्वभूमीवर जर राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ सोडून देण्याचा निर्णय घेतला तर विरोधक नक्कीच या मुद्द्याचे भांडवल करतील. याआधीही राहुल गांधी वायनाड मतदारसंघ सोडून जातील, अशा प्रकारचा प्रचार विरोधकांनी केला आहे. त्यामुळेच पक्षाचा केरळमधील जनाधार गमावला जाऊ नये, यासाठी प्रियांका गांधींना मैदानात उतरवण्याची चतुर खेळी काँग्रेसने केली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress has announced priyanka gandhis candidacy from wayanad lok sabha constituency bypolls gkt

First published on: 15-10-2024 at 23:08 IST

संबंधित बातम्या