विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; महाराष्ट्रात निराशा अन् झारखंडमध्येही पक्ष कमकुवत, कारण काय?

Assembly election 2024 महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दोन्ही राज्यांत कोणाचे सरकार येणार, हे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

congress in assembly election
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला असल्याचे चित्र आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दोन्ही राज्यांत कोणाचे सरकार येणार, हे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला असल्याचे चित्र आहे. काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचा पराभव झळया आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ९९ जागा जिंकल्यानंतर, हरियाणातील पराभव, जम्मू-काश्मीरमधील कमी झालेल्या जागा आणि महाराष्ट्र व झारखंडमधील निकाल पाहता, काँग्रेस पक्ष अपेक्षित यश मिळविण्यात कुठे ना कुठे कमी पडला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवाचे चित्र

सुरुवातीच्या आकडेवारीवरून हे दिसून येते की, काँग्रेसला महाराष्ट्रात पराभवाचा सामना करावा लागणार आहे. सकाळी १० पर्यंत मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यापेक्षा काँग्रेस किंचित पुढे होती. झारखंडमध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. परंतु, झारखंडमध्ये मित्रपक्ष जेएमएमच्या आघाडीमुळे इंडिया आघाडी झारखंडमध्ये सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. परंतु, निकालाचे एकूण चित्र पाहता, काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती

हेही वाचा : विधानसभेचे ७० लाख वाढीव मतदान

विशेषत: महाराष्ट्रात, जिथे स्वबळावर काँग्रेस आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांनी मिळून लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीचा मोठा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांची आक्रमक मोहीम पाहता, आरक्षणाचा मुद्दा उचलून भाजपाच्या विजयी जागा कमी करण्यात यश आले होते. त्यात भर पडली होती ती जात जनगणनेच्या मुद्द्यांची. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून हा मुद्दा वारंवार प्रचार सभांमध्ये उपस्थित केला जात होता. त्याच घोषणा घेऊन काँग्रेस पुन्हा महाराष्ट्रात प्रचारात उतरली.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा एनडीएमध्ये जाण्यास तयार आहेत, असे निराश झालेल्या पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी सांगितले. “भाजपाने प्रचंड पैसा खर्च केला. ही निवडणूक लाटेवर स्वार झालेली असेल, याचा आम्हाला कधीच अंदाज आला नव्हता. अर्थात, अशा निकालाची अनेक कारणे असू शकतात. आमचे जागावाटप योग्य नव्हते. युतीतील सर्व नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण, लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे,” असे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. ६२ विधानसभा मतदारसंघ आणि १० लोकसभा मतदारसंघ असलेल्या विदर्भातून काँग्रेसला मोठी अपेक्षा होती. लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) प्रत्येकी एक जागा जिंकली होती. काँग्रेस या प्रदेशात पारंपरिकपणे मजबूत आहे; परंतु भाजपाने गेल्या दोन दशकांत या भागात मोठी मजल मारली आहे.

हेही वाचा : तावडे यांची राहुल गांधी, खरगेंना नोटीस; २४ तासांत आरोप मागे घ्या, अन्यथा १०० कोटींचा बदनामीचा दावा

२०१४ मध्ये भाजपाने विदर्भात ६२ पैकी ४४ जागा जिंकून विजय मिळवला होता. २०१९ मध्ये त्यांची एकूण संख्या २९ जागांवर घसरली होती. काँग्रेसला विदर्भात पुनरुज्जीवनाचा विश्वास होता आणि लोकसभा निकाल पाहता, हा विश्वास बळावला होता. परंतु, निकालाचे आकडे पाहता, हे पूर्वानुमान चुकीचे ठरले. शेतकरी संकटाचा मुद्दा महाराष्ट्रात काँग्रेसने वारंवार उपस्थित केला होता. मात्र, या मुद्द्याचा काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाची संख्या ३०३ वरून २४० पर्यंत कमी करण्यात काँग्रेसला यश आले होते. मात्र, आता काँग्रेस पुन्हा संकटात सापडली आहे. दुसरीकडे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने हरियाणाप्रमाणेच नशीब फिरवीत महाराष्ट्रात यशाकडे वाटचाल सुरू केली आहे. हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर त्यांना महाराष्ट्रात विजय मिळवणे अत्यावश्यक होते. मात्र, ते शक्य न झाल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress in assembly election jharkhand and maharashtra rac

First published on: 23-11-2024 at 16:23 IST

संबंधित बातम्या