Prithviraj Chavan : काँग्रेसला पुन्हा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव

Prithviraj chavan
पृथ्वीराज चव्हाणांचा पराभूत (फोटो – पृथ्वीराज चव्हाण/X)

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत. महाविकास आघाडीची मोट बांधण्याकरता पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर होते. तसंच, महाविकास आघाडीची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी शक्यताही बांधली जात होती. परंतु, त्यांचा दारुण पराभव झाला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. याआधी २०१४ आणि २०१९ साली त्यांनी निसटता विजय प्राप्त केला होता. २०१९ साली भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याविरोधात सहा हजारांच्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. तर २०१४ साली काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील-उंडाळकर यांचा चव्हाण यांच्याविरोधात १६ हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत होती. परंतु, त्यांचा पराभव झाला आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
maharashtra assembly election 2024 narahari jhirwal vs sunita charoskar dindori assembly constituency
लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

दक्षिण कराड विधानसभेचा राजकीय इतिहास

भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर १९५१ आणि १९५७ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाकडून यशवंतराव मोहिते यांनी याठिकाणी विजय मिळवला होता. त्यानंतर यशवंतराव मोहिते हे काँग्रेस पक्षात आले. १९६२ ते १९७८ पर्यंतच्या चार निवडणुकीत यशवंतराव मोहिते यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला. त्यानंतर १९८० ते २००९ अशा लागोपाठ सात निवडणुकांमध्ये विलासराव पाटील उंडाळकर यांनी विजय प्राप्त केला. २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये उमेदवारी दिली गेली. तेव्हापासून सलग दोनवेळा पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व करत होते.

कराड दक्षिणचा निर्णय झाला आहे. हवाओंका रूख बदल चुका है, असे जाहीर करून महायुतीचे अतुल भोसलेच विजयी होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे मटेरियल नसून ते आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली होते. तसेच आमच्या पेनाला कधी लकवा मारत नाही, असे सांगून फडणवीस यांनी कराड दक्षिणसाठी कोट्यवधीचा निधी दिला असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी राजस्थानचे नेते सचिन पायलट आणि इतर मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. तरीही पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव झाला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader former chief minister prithviraj chavan defeated by bjp atul bhosale sgk

First published on: 23-11-2024 at 14:49 IST

संबंधित बातम्या