लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून नाराजीनाट्य रंगल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. काँग्रेसने राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“काँग्रेसला मुस्लीमांची मते तर हवी असतात, पण त्यांना उमेदवारी का नाही?”, असा प्रश्न उपस्थित करून नसीम खान यांनी आपली नाराजी उघड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबईतून तिकीट मिळविण्यासाठी नसीम खान प्रयत्नशील होते, मात्र याठिकाणी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते नाराज झाले.

Eknath Khadse is waiting for response from BJP
भाजपकडून प्रतिसादाची खडसे यांना प्रतीक्षा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
Ramdas Athawale, Shivaji maharaj statue, sculptor,
शिव पुतळा उभारण्याचे काम नवख्या शिल्पकाराला देणं चुकीचं होतं – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Rohit Pawar Nitin Gadkari
रोहित पवारांनी घेतली गडकरींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
President rule, Balasaheb Thorat,
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी
jay pawar
बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय
congress chief claim govt u turn on lateral entry
आमच्यामुळेच निर्णय रद्द!‘थेट भरती’वरून काँग्रेस अध्यक्षांचा दावा, ‘इंडिया’ नेत्यांची सरकारवर टीका

नसीम खान यांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ते लोकसभा मतदानाचे जे टप्पे उरले आहेत, त्याच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. यासाठी नसीम खान यांनी दोन कारणे दिली आहेत. पहिले म्हणजे, महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. दुसरे कारण म्हणजे, राज्यातील अनेक मुस्लीम संघटना, नेते आणि पक्षातील कार्यकर्ते यांना अपेक्षा होती की, काँग्रेस पक्ष तरी निदान एखाद्या मुस्लीम नेत्याला उमेदवारी देईल. पण दुर्दैवाने काँग्रेसनेही उमेदवारी दिलेली नाही.

ताजी अपडेट

नसीम खान हे नाराज असल्यामुळे एमआयएम पक्षाने त्यांना लोकसभा लढविण्याचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे. थोड्याच वेळात नसीम खान पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार आहेत. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना एमआयएमकडून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले जाते