Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतदानानंतर अनेक चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूने होते. तोच कल आता मतमोजणीतही पाहायला मिळत आहे.
दुपारी दोन वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस १३३ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ६७ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २० जागांवर आघाडी मिळाली आहे. बहुमताचा आकडा काँग्रेसच्या बाजुने झुकत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. तर भाजपाच्या काही नेत्यांनी पराभव मान्य केला आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीने कर्नाटकमध्ये ऑपरेशन ‘लोटस’ करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला. पण त्याचा फार उपयोग झाला नाही. राहुल गांधींच्या पदयात्रेचा काँग्रेसला फायदा झाला, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी दिली.
‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्ही १३० जागांचा आकडा पार करू, हा काँग्रेसचा मोठा विजय आहे. कर्नाटकातील लोकांना बदल हवा होता, कारण ते भाजप सरकारला कंटाळले होते. भाजपाने ऑपरेशन ‘लोटस’वर भरपूर पैसा खर्च केला. पण राहुल गांधींच्या पदयात्रेची पक्षाला प्रचंड मदत झाली.”