पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून रिंगणात उतरले होते, मात्र आम आदमी पक्षाच्या जीवन ज्योती कौर यांनी त्यांचा पराभव केला. सिद्धू यांच्याशिवाय मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आम आदमी पक्षाने  राज्यात एकूण ११७ पैकी ९२ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी आपल्या मतदारसंघात पोहोचून जनतेचे आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे परिवर्तनाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. नवीन प्रणाली आणण्याच्या या उत्कृष्ट निर्णयाबद्दल मी पंजाबच्या जनतेचे अभिनंदन करतो, असे सिद्धू म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष असताना असे कसे म्हणता येईल, असे विचारले असता, जनतेने परिवर्तनाला निवडून दिले असून ते कधीही चुकीचे नसतात, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे. आपण नम्रतेने समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे,” असेही ते पुढे म्हणाले.

“पंजाबची उन्नती हे आमचे ध्येय आहे आणि त्यापासून आम्ही कधीही विचलित होणार नाहीत आणि कधीही मागे हटणार नाहीत. जेव्हा एखादा योगी धर्मयुद्धावर असतो, तेव्हा तो सर्व बंधने तोडतो आणि सर्व मर्यादांपासून मुक्त होतो. त्याला मृत्यूची भीतीही वाटत नाही. मी इथे पंजाबमध्ये आहे आणि इथेच राहणार आहे. त्याला जिंकण्याची किंवा हरण्याची पर्वा नसते,” असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

“माझे लोकांशी असलेले नाते पक्के नाही, ते आध्यात्मिक आणि मनापासून आहे. जनतेशी माझे नाते केवळ निवडणुकीतील विजय आणि पराभवापुरते मर्यादित नाही. मला पंजाबमधील लोकांचे कल्याण आणि त्यांच्या कल्याणात देव दिसतो,” असे सिद्धू म्हणाले.

अमृतसर: शिवाय नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडून अकाली दलाचे बिक्रम सिंह मजिठिया हेही या जागेवर निवडणूक लढवत होते. पण या दोन्ही दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि ‘आप’च्या उमेदवाराने विजय मिळवून सर्वांनाच चकित केले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress navjot sidhu says punjab took an excellent decision after aap win abn