Haryana Vidhan Sabha Election 2024 : हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निकाल…”

Haryana Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत हरियाणा विधानसभा निकालाबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Congress leader pawan khera question
हरियाणातील पराभवाबाबत काँग्रेसची प्रतिक्रिया (फोटो- संग्रहित छायाचित्र)

Haryana Vidhan Sabha Election 2024 : एग्झिट पोल्सचे अंदाज आणि राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष पाहून यावेळी हरियाणात काँग्रेस पक्ष सत्तेत येणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आजच्या (८ ऑक्टोबर) मतमोजणीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे भाजपाने सलग तिसऱ्यांना हरियाणात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. दरम्यान, या पराभवाबाबत आता काँग्रेस पक्षाकडून भाष्य करण्यात आलं आहे.

नेमकं काय म्हणाले पवन खेरा?

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. हरियाणातील निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच एका वाक्यात या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झाल्यास, हा व्यवस्थेचा विजय असून लोकशाहीचा पराभव आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही, असेही ते म्हणाले.

Congress manifesto announced for Haryana print politics news
शेतकरी कल्याण, रोजगारनिर्मितीवर भर; हरियाणासाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?
Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत
Atram has challenged ownparty itself sparking controversy in mahayuti
भाजप नेत्याचे स्वपक्षालाच आव्हान! म्हणाले, “उमेदवारी मिळाली नाही तरी…”
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
haryana election result Vinesh Phogat
Vinesh Phogat Net Worth: काँग्रेसची उमेदवार, कुस्तीपटू विनेश फोगटची संपत्ती किती? निवडणूक अर्ज भरताना केले जाहीर

हेही वाचा – Haryana Assembly Election 2024 Result: हरियाणामध्ये काँग्रेसचं काय चुकलं? ही आहेत पराभवाची ५ कारणं

हेही वाचा – Haryana Assembly Election Result 2024 Live : “विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा हा विजय”, हरियाणातील यशानंतर मोदींची प्रतिक्रिया

ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा काँग्रेसचा आरोप

पुढे बोलताना त्यांनी भाजपाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. हिसार, महेंद्रगड आणि पानिपत जिल्ह्यांमधून आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. काही ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के असल्याचे आमच्या उमेदवारांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के आहे, त्या जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. ज्या ईव्हीएमच्या तक्रारी नाहीत, त्यांच्या बॅटरी ६० ते ७० टक्के आहेत, असं काँग्रेसच्या उमेदवारांकडून सांगण्यात येत असल्याचं, पवन खेरा यांनी सांगितलं. तसेच या सर्व तक्रारी घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – Girish Kuber: हरियाणात काँग्रेस, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे काय चुकले? गिरीश कुबेर यांचे विश्लेषण

भाजपाला ४८ तर काँग्रेसला ३७ जागांवर मिळाला विजय

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भारतीय लोकदल पक्षाने २ तर अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress reaction on haryana vidhan sabha election 2024 result spb

First published on: 08-10-2024 at 19:36 IST

संबंधित बातम्या