लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे संपले आहेत. अशात आता सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे ४ जूनकडे कारण ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र त्याआधीही लक्ष आहे ते एक्झिट पोल्सकडे काँग्रेसने एक्झिट पोलच्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचं ठरवलं आहे. तरीही आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत असा दावा केला आहे. एवढंच नाही तर एक्झिट पोल्स सुरु होतानाच त्यांनी लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार ते जाहीर केलं आहे.

पवन खेरा यांची पोस्ट काय?

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. १ जून रोजी जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलसंदर्भात माध्यमांवर होणाऱ्या कोणत्याही चर्चेत काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होईल, तेव्हा तो निकाल सर्वांसमोर असेल. केवळ माध्यमांच्या टीआरपीसाठी अशा कोणत्याही चर्चेत सहभागी होण्याचं समर्थन आम्ही करत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Mahavikas Aghadi, seats, Communist Party of India,
निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले! ‘भाकप’कडून इतक्या जागांची मागणी
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Once again Dushkali Forum in Sanglis politics
सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘दुष्काळी फोरम’
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध
uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?
mahavikas aghadi Mumbai latest marathi news
‘मविआ’त जागावाटपात सहमतीचा अभाव
Jammu and Kashmir assembly elections
नंदनवनातील निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये उद्या मतदान, १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक
Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…

हे पण वाचा- Exit Poll 2024 Live Update : काँग्रेसला एक्झिट पोल्सचे अंदाज अमान्य; पवन खेरा म्हणाले, “२००४ साली अटल बिहारी वाजपेयींना…”

काँग्रेसची पोस्ट काय?

जनतेचा एक्झिट पोल असं नाव देत काँग्रेसने त्यांची संख्या जाहीर केली आहे. अन्यायावर न्यायाचा विजय होईल असाही दावा काँग्रेसने केला आहे. २९५ पेक्षा अधिक जागा इंडिया आघाडीला मिळतील असं काँग्रेसने म्हटलं आहे. तसंच एक उत्तम चित्रही त्या ट्वीटसह पोस्ट केलं आहे.

हे पण वाचा- Maharashtra Exit Poll 2024 : असली-नकलीच्या राजकराणाला महाराष्ट्राची जनता कंटाळली? काय सांगतात एक्झिट पोल

काँग्रेसने एकाही एक्झिट पोलच्या चर्चेत जाहीर न झाल्याचं दिसतं आहे. तसंच त्यांनी २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असं म्हटलं आहे. महाराष्ट्रात काय काय होणार तसंच देशात काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आता सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल्स सुरु झाले आहेत. विविध प्रकारचे पोल्स समोर येत आहे. मात्र या पोल्समध्ये सहभागी न होण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. मात्र अशात अमित शाह यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे.

काँग्रेसवर अमित शाह यांची टीका

“लोकसभा मतदान सुरु झालं त्या दिवसापासूनच काँग्रेस पक्ष नकारात्मक मूडमध्ये आहे. लोकसभेसाठी ज्या प्रचारसभा काँग्रेसने घेतल्या त्यात त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आलं की त्यांनाच बहुमत मिळेल. पण त्यांना हे पक्कं ठाऊक आहे की त्यांचा दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही एक्झिट पोल्सनंतरच्या चर्चांमध्ये सहभाग घेणार नाही. राहुल गांधींकडे जेव्हापासून काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे तेव्हापासून काँग्रेस नकारात्मकतेकडेच झुकली आहे. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होणार आहे हे पटल्यानेच काँग्रेसने एक्झिट पोल्सवर बहिष्कार घातला आहे. मी तर त्यांना सल्ला देईन की त्यांनी अशा प्रकारे पलायन करु नये उलट आत्मचिंतन केलं पाहिजे. ” दुसरीकडे पवन खेरा यांनी आम्ही निकालाच्या दिवशी आनंद साजरा करु तुम्ही आज आनंद साजरा करा असा खोचक सल्ला दिला आहे.