संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी हा दावा केला आहे की काँग्रेसही काही वर्षांमध्ये लुप्त होऊन जाईल. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसमध्ये जी अंतर्गत गटबाजी सुरु आहे त्याची तुलना बिग बॉसच्या घरात होणाऱ्या भांडणांशी केली आहे. बिग बॉसच्या घरात जशी भांडणं होतात त्याच प्रकारे काँग्रेसचे नेते रोज एकमेकांवर आरोप आणि एकमेकांचे कपडे फाडत आहेत असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजनाथ सिंह यांनी काय म्हटलं आहे?

राजनाथ सिंह म्हणाले, काँग्रेसचे लोक जवळपास रोज पक्ष सोडत आहेत. एकापाठोपाठ लोक काँग्रेस पक्ष सोडत आहेत. भाजपात येत आहेत, त्यामुळे मला वाटतं आहे की काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे नामशेष होऊन जाईल असं मला वाटतं. पौडी या लोकसभा मतदारसंघातून अनिल बलूनी लढत आहेत. त्यांच्या प्रचारसभेत राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- “राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…”

२०२४ नंतर मुलं असही विचारु शकतील की काँग्रेस म्हणजे काय?

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीनंतर काही वर्षांनी मुलांना काँग्रेस म्हणजे काय? हे विचारतील. काँग्रेस नेते एक-दुसऱ्याशी रोज भांडत आहेत. टेलिव्हिजनवर बिग बॉसमध्ये ज्याप्रमाणे ते लोक भांडत असतात. रोज एकमेकांशी काँग्रेसचे नेते तसंच वागत आहेत. तसंच एकमेकांचे कपडे फाडत आहेत.” असं राजनाथ सिंह म्हणाले.

गढवालमध्ये ४५ टक्के ठाकूर, ३० टक्के ब्राह्मण, १८ टक्के अनुसूचित जातीचे मतदार आहेत. पौडी गढवाल भौगोलिक स्थिती रामनगर, श्रीनगर, कोटद्वार या ही ठिकाणं वगळता मोठा भाग हिस्सा ग्रामीण आहे. त्यामुळे ही सीट महत्त्वाची मानली जाते आहे.