२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवलं आहे. तर, इंडिया आघाडी थोडक्याने बहुमत पार करण्यासाठी कमी पडली. त्यामुळे एनडीएकडून आता सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. तर, इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेसाठी लागलेल्या बहुमताचा आकड्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर तुफान प्रहार केले.

“पुढच्या १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडी पूर्वी हळूहळू बुडत होते. पण आता आणि मी स्वच्छपणे पाहू शकतो की इंडिया वाल्यांना अंदाज नाहीय की हळूहळू ते बुडत होते, आणि तेजीने ते गर्तमध्ये जाणार आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
PM Narendra Modi On Congress
PM Narendra Modi : “काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला, पण आता…”, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
odi’s call for consolidation was aimed at addressing the BJP’s growing challenge in Dhule City.
Narendra Modi : धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’चा नारा का दिला? काय आहे कारण?
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
narendra modi criticized congress
“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
PM Narendra Modi On Mahavikas Aghadi
PM Narendra Modi : “महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी”, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; म्हणाले, भ्रष्टाचारात काँग्रेसची पीएचडी”

हेही वाचा >> नरेंद्र मोदींचं वक्तव्य “एनडीए इतकं यश कुणालाच मिळालेलं नाही, सरकार चालवण्यासाठी बहुमत हवं, पण…”

“इंडिया आघाडी देशातील सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. भारताच्या सामान्य लोकांच्या व्यक्तीचीही काही मतं आहेत. जे नेते जमिनीशी जोडलेले असतात त्यांनाच सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकतात. पण ते तिथे कमी पडले. मी आशा करतो की ते लोकशाहीचा सन्मान करतील. पंरतु, त्यांच्या व्यवहारामुळे वाटतं की कदाचित त्यांच्यात ही क्षमता येण्याची वाट पाहावी लागेल”, असंही ते पुढे म्हणाले.

“आपल्या पक्षाच्या पंतप्रधानाला हे किंमत देत नाहीत. त्यांचे अध्यादेश फाडतात. यांच्या नेत्यांना परदेशातील कार्यक्रमात खुर्ची नसायची. लोकशाही आपल्याला सर्वांचा आदर करायला शिकवते. विरोधी पक्षातही जे खासदार जिंकून आले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करतो. गेल्या १० वर्षांपासून मला एका गोष्टीची उणीव जाणवत होती. सखोल चर्चा, उत्तम वाद-विवाद या गोष्टींची उणीव भास होती, या नव्या खासदारांच्या निमित्ताने ही उणीव कमी भासेल अशी आशा व्यक्त करतो.

हेही वाचा >> ‘एनडीएचं सरकार किती वर्ष टिकणार?’, नरेंद्र मोदी म्हणाले…

जनता आणि सरकार यांच्यातली दरी एनडीएने आपल्या कार्यकाळात मिटवली

देशाने असाही काळ पाहिला की सरकार आणि जनता यांच्यात एक अदृश्य दरी होती. मात्र एनडीएच्या दहा वर्षांच्या काळात ही दरी आपण मिटवली. येणाऱ्या दहा वर्षांच्या काळात मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. येणाऱ्या दहा वर्षांमध्ये गुड गव्हर्नन्स, विकास, लोकांचं आयुष्यमानाचा दर्जा वाढवणं यावर काम करणार आहोत. तसंच मला हे वाटतं मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप जितका कमी होईल तितकी लोकशाही मजबूत होईल असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.