Devendra Fadnavis :आज महायुतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांचं रिपोर्टकार्ड सादर केलं. एवढंच नाही तर आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, खुर्ची हे आमचं लक्ष्य नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी शंखनाद या एका शब्दाने एक्स पोस्ट केली होती. राज्यात निवडणुकींचा शंखनाद झालाय, असं त्यांना म्हणायचं होतं. आजही महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झाला आहे असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, “विरोधक एकीकडे म्हणत आहेत की राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि वर घोषणा करतात की त्यांचं सरकार आल्यावर ते संपूर्ण कर्जमाफी करणार आणि इतरही अनेक घोषणा करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आधी ठरवावं की सरकारकडे योजनांसाठी पैसे आहेत की नाहीत? पैसे असतील तर ते पुढची कर्जमाफी करू शकतील. मात्र, आम्ही ज्या योजना आतार्यंत सांगितल्या आहेत, त्या पूर्ण विचार करून जाहीर केल्या आहेत. त्या योजना यापुढेही चालू राहतील. प्रत्येक योजनेच्या पाठिशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू. मात्र विरोधक गोंधळले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करावी असं त्यांना वाटतं. परंतु, मला एक गोष्ट सर्वांना सांगायची आहे की या निमित्ताने महाविकास आघाीचा पर्दाफाश झाला आहे, तसंच लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी असणार आहे असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जाहीर केलंं.”

शरद पवार यांना आव्हान

महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं आहे. फडणवीस म्हणाले, सत्ता पक्षाला कुठलीही चिंता नाही. मुख्यमंत्री स्वतःच इथे आमच्याबरोबर बसले आहेत. त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण. माझं शरद पवारांना खुलं आव्हान आहे शरद पवारांनी तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ते सांगा? असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्याकडे कुणालाही मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागलेले नाहीत. आमचं काम हाच आमचा चेहरा आहे. महाविकास आघाडीने आता विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा.” असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.

जागावाटप पूर्ण झालं की आम्ही तुम्हाला माहिती देऊ. आम्ही अगदी अंतिम टप्प्यावर आहोत. या सगळ्यात आम्ही साधारणपणे कुठल्या पक्षाचा कुठे जोर आहे? तीन पक्ष मिळून कुठे जिंकता येईल? या सगळ्या गोष्टी सांगू. फॉर्म्युला असा मध्येच सांगता येणार नाही. सगळं ठरलं की आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis challenge to sharad pawar said first you declare cm face of mva scj