DCM Devendra Fadnavis : “आमच्यासाठी शंखनाद, पण काहींसाठी ऐलान”, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर डागली तोफ; म्हणाले, “स्थगिती सरकार…”

Mahayuti Press conference : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदे घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. तर आता टीका टीप्पणीलाही सुरुवात झाली आहे.

devendra fadnavis1
देवेंद्र फडणवीसांची टीका (फोटो – संग्रहित छायाचित्र)

DCM Devendra Fadnavis Mahayuti Press conference : राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. महायुती सरकारने आज गेल्या सव्वा दोन वर्षातील कामांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेमार्फत मांडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडवी टीका केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदे घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंखनाद या एका शब्दाने एक्स पोस्ट केली होती. राज्यात निवडणुकींचा शंखनाद झालाय, असं त्यांना म्हणायचं होतं. आजही महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींतरा ऐलान झाला आहे.”

हेही वाचा >> Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

कामाची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती

“आज या निमित्ताने आमच्या महायुती सरकारने सव्वा दोन वर्षांत जे काही कार्य केलंय त्याचं रिपोर्ट कार्ड ठेवतोय. हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे. स्थगिती सरकार गेल्यानंतर गतीचं आणि प्रगतीचं सरकार आलं. ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकराने परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या. या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती सांगण्याऱ्या आहेत”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

“निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमच्या समोरची लोकं सातत्याने फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. पण सर्व निवडणूक आयोगाच्या हातात असतं. त्यांना स्वायत्ता दिली आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली भाजपा-शिवसेना सरकार अस्तित्वात आलं. वर्षभराने आम्ही (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) समाविष्ट झालो. गेले दीड वर्षे सर्वजण काम करतोय. २०२२-२४ चं रिपोर्ट कार्ड देत असातना सातत्याने आमच्याबद्दल सांगितलं जातं की तिजोरी मोकळी केली आहे, कर्जबाजारी झालो आहोत. मी अतिशय जबाबादारीने सांगतोय, निवडणुका जवळ येत असताना खूप कॅबिनेट होतात. तेव्हा अनेक निर्णय घेतले जातात. शेवटी शेवटी काही राहून गेलेले विषय येत असतात. त्यातून विषय मंजूर करतो. काही विचारपूर्वक योजना दिल्या. या योजनांची टिंगळटवाळी झाली, बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. लाडकी बहीण योजना पॉप्युलर झाली, महिला समाधानी आहेत. सर्व घटकांतील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. काहीही बोलण्याचा प्रयत्न होत आहे. आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण काहीतरी तारतम्य ठेवण्याची गरज आहे”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dcm devendra fadnavis criticise opposition party over ailan for maharashtra election 2024 sgk

First published on: 16-10-2024 at 12:03 IST
Show comments