Delhi Election Results 2025 Vote Counting LIVE Updates: दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्लीतल्या ७० जागांसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. एकीकडे अरविंद केजरीवाल यांची अटक, सुटका आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर आम आदमी पक्षानं सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असताना दुसरीकडे काँग्रेसकडून प्रचारासाठी दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं होतं. या दोन्ही पक्षांसमोर यंदा कडवं आव्हान होतं ते भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं.
Delhi Election Result LIVE, 08 February 2025: दिल्लीवर कुणाची सत्ता? पुन्हा आप, भाजपाला लाभ की काँग्रेसचा कमबॅक?
Delhi Vidhan Sabha Election 2025 Results LIVE: पोल डायरीचे एक्झिट पोल भाजपाच्या बाजूने...
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पोल डायरीच्या एक्झिट पोल्सनुसार दिल्लीत भाजपाला ४२ ते ५० जागा, आपला १८ ते २५ तर काँग्रेसला ० ते २ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Delhi vidhan sabha elections Result: दिल्लीचे एक्झिट पोल्स काय सांगतात?
चाणक्य स्ट्रॅटेजीच्या अंदाजानुसार दिल्लीत भाजपाला ३९ ते ४४, आपला २५ ते २८ तर काँग्रेसला अवघ्या २ ते ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Delhi Elections : मसाज पार्लरच्या कंपन्या एग्झिट पोल्स घेतायत की काय? आपच्या खासदाराची टिप्पणी
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या एक्झिट पोल्सचे अंदाज आपच्या विरोधात गेल्यानंतर आपकडून त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Delhi Assembly Election 2025 Results: दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस संपेल…मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. लोकसभा निवडणुकीत दिसणारा कल विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे बदलल्याची प्रतिक्रिया या निकालांवर व्यक्त करण्यात आली.
Delhi Exit Poll Results 2025 : “दिल्लीत आम्हीच सत्ता स्थापन करू”, Exit Poll नंतर आम आदमी पक्षाचा दावा
Delhi Election 2025 Exit Poll : दिल्लीत ७० जागांसाठी मतदान झाले असून आता एक्झिट पोल्सचे अंदाज समोर यायला सुरू झाले आहेत.
Delhi Election : दिल्लीत ऑपरेशन लोटस? आपच्या १६ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर, केजरीवालांचा खळबळजनक आरोप
अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे...
Delhi assembly election 2025 Live: ‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
दिल्लीला जरी राज्याचा दर्जा नसला तरी, येथील निकालांचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होईल. भाजपने बाजी मारली तर, हरियाणा, महाराष्ट्रापाठोपाठ पक्षासाठी मोठे यश असेल. बिहारमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा आहे.
Delhi Assembly Election 2025 Results Live: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर होणार असून त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण येणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास आतिशी यांच्याऐवजी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची शक्यता आहे.
Delhi Assembly Election Result 2025: सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडलं असून आज ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. दिल्लीतील ७० जागांसाठी हे मतदान पार पडलं.
दिल्लीतील मध्यमवर्गासाठी आप-भाजपमध्ये चढाओढ (संग्रहित छायाचित्र)