Delhi Election Results 2025 Vote Counting Highlights : दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्लीतल्या ७० जागांसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. एकीकडे अरविंद केजरीवाल यांची अटक, सुटका आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर आम आदमी पक्षानं सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असताना दुसरीकडे काँग्रेसकडून प्रचारासाठी दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं होतं. या दोन्ही पक्षांसमोर यंदा कडवं आव्हान होतं ते भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

Live Updates

Delhi Election Result LIVE, 08 February 2025: दिल्लीवर कुणाची सत्ता? पुन्हा आप, भाजपाला लाभ की काँग्रेसचा कमबॅक?

20:26 (IST) 8 Feb 2025

Rahul Gandhi Post on Delhi vidhan sabha elections Result: दिल्ली निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया…

राहुल गांघींची दिल्ली निकालांवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही दिल्लीचा जनादेश स्वीकार करतो. दिल्लीतील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या योगदानासाठी आणि सर्व मतदारांना त्यांच्या समर्थनासाठी धन्यवाद. प्रदूषण, महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात, दिल्लीची प्रगती व दिल्लीकरांच्या अधिकारांसाठीची ही लढाई अशीच चालू राहील”!

https://twitter.com/RahulGandhi/status/1888214153229427035

18:30 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पक्ष कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीत भाजपा मुख्यालयात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद…

16:30 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results Live: परवेश वर्मा यांच्या मुलींनी केलं केजरीवाल यांना लक्ष्य

भाजपाचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यांच्या मुली सनिधी व तृषा यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

15:48 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: कोणतीही कागदपत्र सचिवालय परिसराच्या बाहेर जाऊ नयेत – सामान्य प्रशासन विभागाचे आदेश

दिल्लीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने दिल्ली सचिवालयाला आदेश जारी केले आहेत. प्रशासनाशी संबंधित कोणत्याही फाईल किंवा कागदपत्र दिल्ली सचिवालयाच्या बाहेर जाऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1888136470290141449

14:59 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results: अजित पवार यांची प्रतिक्रिया…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीच्या निकालांवर प्रतिक्रिया देणारी पोस्ट केली आहे.

14:40 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results: ‘बाहुबलीं’विरोधातकाम करणाऱ्या माझ्या टीमचं मी अभिनंदन करते – अतिशी

दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांची निकालावर पहिली प्रतिक्रिया

14:33 (IST) 8 Feb 2025

PM Modi on Delhi Vidhan Sabha Election 2025 Results LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया

“दिल्लीचा चौफेर विकास आणि इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यात आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही ही आमची गॅरंटी आहे. यासोबतच आम्ही हेही निश्चित करू की विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची महत्त्वाची भूमिका असेल”, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

14:30 (IST) 8 Feb 2025
Delhi Election Results 2025 Vote Counting: अरविंद केजरीवाल यांची पराभवावर पहिली प्रतिक्रिया

मी भाजपाला विजयासाठी शुभेच्छा देतो. मला आशा आहे की जनतेच्या विश्वासानुसार भाजपा काम करेल. गेल्या १० वर्षांत आम्ही खूर सारी कामं केली. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज अशा अनेक बाबतीत आम्ही कामं केली. दिल्लीतील पायाभूत सुविधाही सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू. आता आम्ही लोकांच्या सुख-दु:खात सोबत राहू – अरविंद केजरीवाल

13:44 (IST) 8 Feb 2025

Amit Shah on Delhi assembly election 2025 Live: अमित शाह यांची एक्स पोस्ट

“दिल्लीच्या जनतेनं हे दाखवून दिलंय की जनतेला वारंवार खोट्या आश्वासनांनी फसवलं जाऊ शकत नाही. जनतेनं आपल्या मतांनी दूषित यमुना, पिण्याचं प्रदूषित पाणी, खराब रस्ते, सांडपाण्याची अव्यवस्था आणि प्रत्येक गल्लीत उघडलेली दारूची दुकानं याला उत्तर दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

13:18 (IST) 8 Feb 2025

Kumar Vishwas on Delhi assembly election 2025 Live: दिल्लीची केजरीवाल यांच्या तावडीतून सुटका झाली – कुमार विश्वास

“मी दिल्लीतील विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो. मला आशा आहे की ते दिल्लीच्या लोकांसाठी काम करतील. सामान्य आप कार्यकर्त्यांची स्वप्नं धुळीला मिळवणाऱ्या व्यक्तीबद्दल मला कोणतीही संवेदना नाही. दिल्लीची आता त्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा वापर स्वत:च्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांसाठी केला. आज दिल्लीत न्याय झाला. जेव्हा आम्ही टीव्हीवर मनीष सिसोदियांच्या पराभवाचं वृत्त पाहिलं, तेव्हा माझ्या पत्नीला अश्रू अनावर झाले”, असं कुमार विश्वास म्हणाले.

13:07 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results: दिल्लीत आपचा पहिला विजय, इम्रान हुसैन विजयी

भाजपाचे कमल बग्री यांचा पराभव करत आम आदमी पक्षाचे इम्रान हुसैन यांचा बल्लीमारन मतदारसंघात विजय झाला आहे. त्यांनी कमल बग्री यांचा २९ हजार ८२३ मतांनी पराभव केला.

13:06 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: दिल्लीत आपच्या पराभवाची कारणं…

१. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंदर जैन या नेत्यांवर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कारवाई झाली होती. यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली.

२. दिग्गज नेत्यांना ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये तुरुंगातून सोडल्यामुळे त्याचाही त्यांच्या निवडणूक मोहिमेवर परिणाम झाला.

३. दिल्ली महानगर पालिकेतील पक्षाच्या कामगिरीचा मतांवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे.

12:46 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results Live: रोहित पवारांची दिल्ली निकालावर प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या ाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी – रोहित पवार

12:42 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: स्वाती मालिवाल यांनी आपच्या पराभवावर भाष्य केलं आहे

मला आपचा पराभव दिसत होता. मी गेल्या ६ महिन्यांपासून रस्त्यावर उतरून काम केलं आहे. दिल्लीत स्वच्छता आणि इतर मुद्द्यांवरून सरकारविरोधात संतापाचं वातावरण होतं. लोकांमध्ये या सगळ्या बाबतीत संताप होता. आपण सगळ्यांनी यावर शांतपणे बसून विचार करायला हवा – स्वाती मालिवाल

12:32 (IST) 8 Feb 2025

Manish Sisodia Result Delhi Vidhan Sabha Election 2025 LIVE: मनीष सिसोदिया यांचा पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या तीन दिग्गजांपैकी मनीष सिसोदिया फक्त आघाडीवर होते. मात्र, आता त्यांचा अवघ्या ६०० मतांनी पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द मनीष सिसोदिया यांनीच त्यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपला पराभव मान्य करत असल्याचं ते म्हणाले आहेत.

12:20 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results Live: दिल्ली निकालांमधून काँग्रेससाठी कोणता धडा?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा पुन्हा एकदा साफ झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या विजयापेक्षाही काँग्रेसच्या पराभवाची जास्त चर्चा होऊ लागली आहे.

१. इंडिया आघाडीत एकत्र असूनही काँग्रेसनं आपविरोधात आक्रमक प्रचार केला होता.

२. आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलणी फिसकटली

३. आपनं दिल्ली निवडणुकीत काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता. पण नंतर त्याला नकार दिला.

४. काँग्रेस नेत्यांनी आप हाच दिल्लीतील प्रमुख विरोधी पक्ष मानला.

५. इंडिया आघाडीला कमकुवत करण्यासाठी आपच्या नेत्यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं.

६. आपनं काँग्रेसवर भाजपाला फायदा व्हावा अशा पद्धतीने मतांचं ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला.

७. आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच प्रकारच्या मतदार वर्गासाठी प्रयत्न करत होते.

८. आप आणि काँग्रेस यांच्यातील वादाचा शेवटी भाजपाला फायदा झाल्याचं दिसतंय.

11:42 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results: मनीष सिसोदिया आघाडीवर…

एकीकडे खुद्द अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिषी हे भाजपाच्या उमेदवारांसमोर पिछाडीवर असताना दुसरीकडे मनीष सिसोदिया यांच्या रुपात आपला दिलासा मिळाला आहे. दिल्ली विधानसभेच्या जंगपुरा मतदारसंघातून आपचे मनीष सिसोदिया आघाडीवर असून भाजपाचे तरविंदर सिंग मरवाह हे पिछाडीवर आहेत.

11:36 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: सकाळी ११.३० वाजेपर्यंत काय आहे स्थिती?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सकाळी ११.३० पर्यंत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ४४ जागांवर आघाडीवर असून आम आदमी पक्ष २६ जागांवर आघाडीवर आहे.

11:31 (IST) 8 Feb 2025

BJP Celebration for Delhi vidhan sabha elections Result: भाजपाचं मोठं सेलिब्रेशन होणार…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत तीन दशकांनंतर विजय मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून मोठं सेलिब्रेशन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ७ वाजता दिल्ली भाजपा मुख्यालयात या सेलिब्रेशनसाठी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

11:24 (IST) 8 Feb 2025

Anna Hazare Delhi Assembly Election 2025 Results Live: दिल्ली निकालांवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया…

“मी नेहमी म्हणतो की कोणत्याही उमेदवाराकडे स्वच्छ विचार, स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना असायला हवी. या गुणांवरूनच मतदारांचा त्या उमेदवारावर विश्वास बसतो. मी हे अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी त्यांनी मद्यावर लक्ष केंद्रीत केलं. हा मुद्दा उपस्थित का झाला? त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली होती”, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीतील घडामोडींवर मांडली आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1888101723937574920

11:18 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: दिल्लीतील निकालाबाबत काँग्रेसचे संदीप दीक्षित यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“निकालांवरून असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करेल. आम्ही अनेक मुद्दे घेऊन लोकांमध्ये गेलो होतो. पण कदाचित लोकांना असं वाटलं असेल की आम्ही सरकार स्थापन करू शकणार नाही. आम्ही लोकांचा निर्णय मान्य केला आहे”, अशी प्रतिक्रिया संदीप दीक्षित यांनी दिली.

https://twitter.com/ANI/status/1888100605987799373

11:08 (IST) 8 Feb 2025

Delhi Election Results 2025 Vote Counting: दिल्लीत मध्यमवर्ग फिरला – यशवंत देशमुख

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पिछाडीबाबत इंडिया टुडेशी बोलताना राजकीय विश्लेषक व सी-व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी मध्यमवर्गाला जबाबदार धरलं आहे. “दिल्लीत अर्थसंकल्पातील १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या घोषणेचा परिणाम झाला की नाही याबाबत सांगता येत नसलं, तरी दिल्लीत मध्यमवर्ग भाजपाच्या बाजूला झुकल्याचं चित्र दिसत आहे. आम आदमी पक्षाला ४३ टक्के तर भाजपाला ४७ टक्के मतं मिळाली आहेत. आपला मिळालेली ४३ टक्के मतं अल्प उत्पन्न गटातली व महिलांची असून भाजपाच्या बाजूला गेलेली मतं ही मध्यम वर्गाची आहेत”, असं विश्लेषण यशवंत देशमुख यांनी केलं आहे.

11:00 (IST) 8 Feb 2025

Delhi Vidhan Sabha Election 2025 Results LIVE: दिल्लीत आपच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

दिल्लीत भाजपाची सरशी होताना दिसत असतानाच आम आदमी पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

10:52 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: कोण होईल दिल्लीचे मुख्यमंत्री?

भाजपाची दिल्लीत मोठ्या आघाडीच्या दिशेनं आगेकूच चालू असून आता भाजपाकडून कोण मुख्यमंत्रीपदी येईल? याची चर्चा सुरू झाली आहे. यात दुश्यंत कुमार गौतम, पर्वेश वर्मा, अरविंदर सिंग लव्हली, विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय यांची नावं चर्चेत आहेत. पण त्याचबरोबर भाजपा खासदार मनोज तिवारी यांचंही नाव घेतलं जात आहे. “मी निवडणूक लढलेली नाही. पण संध्याकाळपर्यंत निकाल हाती येतील. पक्ष त्यासंदर्भात निर्णय घेईल. पक्ष चांगला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर मनोज तिवारी यांनी दिली आहे.

10:44 (IST) 8 Feb 2025

Delhi Assembly Election 2025 Results: २०२८ पर्यंत यमुना नदी स्पच्छ होणार, भाजपा प्रवक्त्यांचा दावा

दिल्लीत विजयाच्या समीप पोहोचलेल्या भाजपानं २०२८ पर्यंत यमुना नदी स्वच्छ केली जाईल आणि दिल्लीकरांची त्रासातून मुक्तता केली जाईल, असं आश्वासन भाजपाचे नेते टॉम वडक्कन यांनी दिलं आहे.

10:15 (IST) 8 Feb 2025

BJP CM Face in Delhi Election Result 2025: भाजपा जिंकल्यास पक्षाच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

भाजपा जिंकल्यास पक्षाच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

10:03 (IST) 8 Feb 2025

Delhi assembly election 2025 Live: काँग्रेसची झोळी अद्याप रिकामीच!

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा ३८ जागांवर आघाडीवर तर आम आदमी पक्ष २७ जागांवर आघाडीवर, काँग्रेसला अद्याप एकही जागा नाही.

09:39 (IST) 8 Feb 2025

Delhi Election Results: ओमर अब्दुल्ला यांचं दिल्लीबाबत खोचक ट्वीट

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीतील निकालाच्या कलांबाबत खोचक पोस्ट केली आहे. आप आणि काँग्रेस यांच्या पिछाडीच्या मुद्द्यावर ‘और लडो आपस में’ म्हणत ओमर अब्दुल्ला यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

09:35 (IST) 8 Feb 2025

Delhi Election Results 2025 Vote Counting: केजरीवाल यांच्यासमोर भाजपाच्या उमेदवाराची आघाडी

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पिछाडीवर असून त्यांच्यासमोर भाजपाचे उमेदवार परवेश वर्मा हे आघाडीवर आहेत.

09:32 (IST) 8 Feb 2025

Delhi Election Results 2025 Vote Counting: काँग्रेसच्या अलका लांबा पिछाडीवर…

Kalkaji Assembly Election Result: काँग्रेसच्या अलका लांबा कालकाजी विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर

दिल्लीतील मध्यमवर्गासाठी आप-भाजपमध्ये चढाओढ (संग्रहित छायाचित्र)

Delhi Election Result LIVE, 08 February 2025: दिल्लीचा निकाल, कोण होईल मतांनी मालामाल? पाहा निकालाचे सर्व अपडेट्स!