Delhi Vidhan Sabha Exit Poll 2025 : राजधानी दिल्लीत आज विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान पार पडले. सत्तारुढ आप पक्ष आणि विरोधी बाकावरचे काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत येथे पाहायला मिळाली. निवडणुका जाहीर झाल्यापासून आरोप प्रत्यारोप करत वादळी प्रचार झाला. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत. मतटक्का वाढविण्यासाठी विविध व्यावसायिकांनी सवलती जाहीर केल्या होत्या. मतदान संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये बहुतेक एक्झिट पोल्सचे पारडे भाजपाच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.
८ फेब्रुवारीला रोजी दिल्ली विधानसभेचा निकाल लागणार आहे.
एकूण जागा ७०
मतदार १ कोटी ५६ लाख
मतदान केंद्र १३ हजार ७६६
एकूण उमेदवार ६९९
“दिल्लीत आम्हीच सत्ता स्थापन करू”, Exit Poll नंतर आम आदमी पक्षाचा दावा
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर बोलताना, आप नेते सुशील गुप्ता म्हणाले, “ही आमची चौथी निवडणूक आहे आणि प्रत्येक वेळी एक्झिट पोलमध्ये दिल्लीत आपला बहुमत दाखवण्यात आले नव्हते. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांसाठी काम केले आहे. आपल्याला आम आदमी पक्षाच्या बाजूने निकाल लागलेला दिसेल आणि आम्ही सरकार स्थापन करू.”
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली असून, भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सायंकाळी ६ वाजता मतदानाच्या औपचारिक वेळेनंतर रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याची परवानगी आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली असून, भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सायंकाळी ६ वाजता मतदानाच्या औपचारिक वेळेनंतर रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याची परवानगी आहे.
Delhi Election Update : दिल्लीत मतदानासाठी उरले अवघे काही तास, मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा
Delhi Election Update :
दिल्लीत दुपारी तीन वाजपेर्यंत ४६.५५ टक्के मतदान
Delhi records 46.55% voter turnout till 3 pm, as per Election Commission of India pic.twitter.com/ltTMNgmc0x
— ANI (@ANI) February 5, 2025
Delhi Election Update :
#WATCH | #DelhiElection2025 | Visually impaired youngsters cast their votes for the first time. pic.twitter.com/qThmzLNaDX
— ANI (@ANI) February 5, 2025
Delhi Election Update : दिल्लीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हजारांहून अधिक गुन्हे दाखल
आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी दिल्लीत ४ फेब्रुवारीपर्यंत १०९२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३४ हजार ७४६ लोकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
Live Update : दिल्लीत दुपारी एक वाजेपर्यंत ३३.३१ टक्के मतदान
33.31% voter turnout recorded till 1 pm in #DelhiElection2025 pic.twitter.com/e4LOz4Yalf
— ANI (@ANI) February 5, 2025
Delhi Election Updates : दिल्लीत काही ठिकाणी गोंधळ, भाजपा-आपकडून आरोप प्रत्यारोप
जंगपुरा, सिलमपूर आणि चिराग दिल्ली येथून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आप नेते मनीष सिसोदिया यांनी पोलिसांना सांगितलं की जंगपुरा येथे पैशांचं वाटप केलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने बोगस मतदान झाल्याचा दावा केला आहे. बुरखा घालून येणाऱ्या महिलांकडून बोगस मतदान केलं जात असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येतोय.
Delhi Election Update : दिल्लीत वयोवृद्ध नागरिकांनी केलं मतदान
PTI PHOTOS | Delhi polls: Elderly and disabled voters arrive at polling booth to cast their vote. pic.twitter.com/TcIxG7K5br
— Press Trust of India (@PTI_News) February 5, 2025
Delhi Election 2025 : मतदानामुळेच सत्तापरिवर्तन शक्य – उपराष्ट्रपती
मतदान लोकशाहीचा श्वास आहे. लोकशाहीचा आधार आहे. मतदान सर्व अधिकारांची जननी आहे. यापेक्षा मोठा अधिकार कोणताच नाही. लोकशाहीचं महत्त्व तेव्हाच आहे जेव्हा प्रत्येकाने आपले मतदान विवेकाने आणि स्वतंत्रतेने केलं असेल. यामुळे लोकशाही विकसित होते. सर्वांत जुनी आणि मोठी लोकशाही म्हणून देशाची ओळख आहे. येथे सत्तापरिवर्तन फक्त मतदानामुळे शक्य होतं. हा अधिकार भारताच्या प्रत्येक नागरिकाला मिळाला. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा प्रत्येक महिला आणि पुरुषाला हा अधिकार दिला गेला. आपल्याआधी स्वंतत्र झालेल्या देशात असं नव्हतं. लोकशाही व्यवस्थेचा आज मोठा उत्सव आहे. आपण जी पद्धत अवलंबिली आहे, त्यामुळे तुमच्या मतदानाचा निकाल सार्वजनिकरित्या जाहीर केला जातो – जगदीप धनखड, उपराष्ट्रपती
#WATCH | After casting his vote for #DelhiAssemblyElection2025, Vice President Jagdeep Dhankhar says, "Voting is the Oxygen of democracy and base of democracy. It's fundamental to all the rights, and there is no bigger right than this. All the voters should vote for the country.… pic.twitter.com/0ZC1alr0C0
— ANI (@ANI) February 5, 2025
Delhi Election Update : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | #DelhiElection2025 | AAP national convener Arvind Kejriwal, along with his wife Sunita Kejriwal and parents Gobind Ram Kejriwal & Gita Devi, arrives at Lady Irwin Senior Secondary School to cast a vote.
— ANI (@ANI) February 5, 2025
The sitting MLA from New Delhi constituency faces a contest from… pic.twitter.com/5QiqT1XhYR
Delhi Election Update :
दिल्लीत ११ वाजेपर्यंत १९.९५ टक्के मतदान झाले आहे.
19.95% voter turnout recorded till 11 am in #DelhiElection2025 pic.twitter.com/4fNGZvHoBO
— ANI (@ANI) February 5, 2025
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१ ० टक्केच मतदान झाले आहे. ईशान्य दिल्ली जिल्ह्यात सर्वाधिक १०.७० टक्के मतदान झालं असून दक्षिण पश्चिम जिल्ह्यात ९.३४ टक्के मतदान झालंय. तर, नवी दिल्लीत ६.५१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे..
Delhi Election 2025 : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केले मतदान
#WATCH दिल्ली की मुख्यमंत्री आतिशी व कालकाजी विधानसभा सीट से AAP उम्मीदवार अतिशी ने राज निवास मार्ग स्थित सेंट जेवियर्स स्कूल में #DelhiElections2025 के लिए मतदान किया। pic.twitter.com/Ol2thParzJ
— ANI_HindiNews (@AHindinews) February 5, 2025
Delhi Elections Live Update : तुमच्या मतदानाने दिल्लीत सर्वांत विकसित राजधानी बनेल – अमित शाह
मी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जाणाऱ्या बहिणींना आणि भावांना खोटी आश्वासने, प्रदूषित यमुना, दारूची दुकाने, तुटलेले रस्ते आणि घाण पाण्याच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करतो. लोककल्याणाचा भक्कम ट्रॅक रेकॉर्ड आणि दिल्लीच्या विकासासाठी स्पष्ट दृष्टी असलेले सरकार स्थापन करण्यासाठी आजच आपल्या सर्व शक्तीनिशी मतदान करा. तुमचे एक मत दिल्लीला जगातील सर्वात विकसित राजधानी बनवू शकते- अमित शाह</p>
दिल्ली विधानसभा चुनाव में मतदान के लिए जा रहे बहनों-भाइयों से अपील करता हूँ कि वे झूठे वादों, प्रदूषित यमुना, शराब के ठेकों, टूटी सड़कों और गंदे पानी के खिलाफ वोट करें। आज एक ऐसी सरकार बनाने के लिए बढ़-चढ़कर मतदान करें, जिसके पास जनकल्याण का मजबूत ट्रैक रिकॉर्ड हो और दिल्ली के…
— Amit Shah (@AmitShah) February 5, 2025
Delhi Elections Live Update : “जनतेला बदल हवाय”; एस. जयशंकर यांचं विधान
मी सर्वांत लवकर मतदान केलं. माझ्यामते लोकांना बदल हवाय – एस. जयशंकर
#WATCH | EAM Dr S Jaishankar says, "I have been an early voter…I think the public is in a mood for change." https://t.co/mkPc911IXS pic.twitter.com/k6eAYaJjsN
— ANI (@ANI) February 5, 2025
Delhi Elections Live Update : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क
दिल्लीतील निर्मल भवन येथे राहुल गांधी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
#WATCH | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi arrives at the polling station at Nirman Bhawan to cast his vote for #DelhiElections2025 pic.twitter.com/i1qhGR7Xp5
— ANI (@ANI) February 5, 2025
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाला मोठा बूस्टर डोस मिळाला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीतील आठ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश केला. महत्त्वाची बाब म्हणजे ‘आप’ला राम राम ठोकणाऱ्या आठपैकी सात आमदारांचं तिकीट पक्षानं कापलं होतं. मात्र, या आमदारांनी पक्ष सोडताना राज्यातील वाढता भ्रष्टाचार आणि पक्षांतर्गत लोकशाहीच्या अभावाची कारणं दिली. इतकंच नाही, तर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तत्त्वांपासून दूर गेल्याचा आरोपही केला.
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास काही तासांचा अवधी राहिला असून दिल्लीचे आजी-माजी मुख्यमंत्री आतिशी व अरविंद केजरीवाल तसेच, मनीष सिसोदिया या दिग्गज नेत्यांसमोर पराभवाची टांगती तलवार असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.
Delhi Elections 2025 : राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या प्रचारादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार टीका झाली. आगामी काळात हे दोन्ही पक्ष व त्यांचे नेते इंडिया आघाडीच्या एखाद्या बैठकीला उपस्थित राहतील तेव्हा हीच टीका गुंतागुंतीची ठरू शकते. या टीकेमुळे भविष्यातील आघाडीसमोर अडचणी येऊ शकतात. परंतु, ही टीका दोन्ही बाजूंसाठी अपरिहार्य होती. दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता मिळवणे हे काँग्रेसचे धोरण आहे. १९९८ ते २०१३ अशी सलग १५ वर्षे काँग्रेसकडे दिल्लीची सत्ता होती. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीची कमान दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे आपकडून सत्ता परत मिळवण्यासाठी १२ वर्षे राजधानी ज्यांच्या हाती होती अशा पक्षावर व त्यांच्या नेत्यांवर टीका करणं, त्यांनी केलेल्या चुका जनतेसमोर मांडणं काँग्रेससाठी क्रमप्राप्तच होतं. त्यानुसार काँग्रेसने निवडणुकीत निकराने लढा दिला आहे.
Delhi Election Updates : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
BJP vs AAP Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणूक नेहमीच संपूर्ण देशात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरते. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीचे तख्त राखले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपासह काँग्रेसने सत्ताधाऱ्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. राजधानीतील गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘आप’ने काही जागांवर कमी मताधिक्याच्या फरकाने विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही याच जागा सत्ताधाऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात. येत्या ५ फेब्रुवारीला दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे.
सविस्तर वृत्त वाचा
दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत आहे. सत्तारूढ आम आदमी पक्ष (आप) विरोधात भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस असा तिरंगी सामना होईल. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत. मतटक्का वाढविण्यासाठी विविध व्यावसायिकांनी सवलती जाहीर केल्या आहेत.