Delhi Election Result 2024 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते, त्यानंतर आज मतमोजणी पार पडच आहे. या निवडणुकीत भाजपाने मोठं यश मिळवलं असून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय जनता पक्ष दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्याच्या वाटेवर आहे. यादरम्यान आपला मोठा धक्का बसला असून पक्षाचे प्रमुख आणि दिग्गज नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना पराभव पत्करावा लागला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

” यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है| महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

twist in Akshay Shinde case, Badlapur sexual assault Accused shinde parents demand to mumbai high court for closure of case
अक्षय शिंदे प्रकरणात नवे वळण : प्रकरण पुढे लढायचे नाही, ते बंद करा, आरोपी अक्षय शिंदे याच्या आईवडिलांची उच्च न्यायालयात मागणी
Maharashtra transport minister Pratap Sarnaik transport initiatives for msrtc land development
एसटीला भूमिहीन करू नका!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
stalled housing projects in mumbai will be completed in phased manner says dcm eknath shinde
मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद!”

“घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री पराभूत

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मात्र, मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. तरविंदर सिंग मारवाह या ठिकाणाहून विजयी झाले आहेत. तर दुपारपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत भारतीय जनता पक्ष ४६ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २४ जागांवर आघाडीवर आहे. खरं तर दिल्लीच्या निवडणुकीत भाजपा आणि आम आदमी पक्षात मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाला नाकारल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader