BJP won in Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षाला ७० पैकी ४८ तर आम आदमी पक्षाला २२ जागांवर विजय मिळाला. तब्बल २ वर्षांनंतर भाजपा दिल्लीत सत्तेत विराजमान होणार आहे. एकीकडे या दोन पक्षांमध्ये थेट लढत असताना दुसरीकडे काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा दिल्लीत भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात भाजपाच्या विजयापेक्षाही आपचा पराभव आणि त्याला लागलेला काँग्रेसचा ‘हातभार’ याचीच जास्त चर्चा पाहायला मिळत आहे.

दरम्यान, १० वर्षांनंतर दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव होण्यासाठी जसा काँग्रेसच्या उमेदवारांनी लावलेला हातभार कारणीभूत ठरला, तशाच इतरही काही गोष्टी कारणीभूत ठरल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी यातील काही महत्त्वाच्या कारणांचं विश्लेषण केलं असून त्यात काँग्रेस व आपच्या न झालेल्या आघाडीबरोबरच केजरीवाल यांच्या सभ्यतेच्या दिखाव्याला दिल्लीकर कंटाळल्याचा मुद्दाही त्यांनी नमूद केला. त्याचबरोबर दिल्लीतील पायाभूत सुविधांची न झालेली कामेही दिल्लीकरांच्या नाराजीसाठी कारणीभूत ठरल्याचं ते म्हणाले.

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीचा फायदा

केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची मोठी घोषणा यंदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग भाजपाच्या बाजूने वळल्याची चर्चा आहे. आज दिल्लीतील भाजपाच्या विजयमागे हेदेखील एक कारण ठरल्याचा मुद्दा गिरीश कुबेर यांनी मांडला आहे.

यशिवाय, नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी नमूद केला. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. दिल्लीत मोठ्या संख्येनं सरकारी अधिकारी राहात असल्यामुळे ही मतं भाजपाच्या पारड्यात पडल्यामुळे पक्षासाठी मोठी मदत झाल्याचं दिसून आलं.

Story img Loader